प्रिय नौकरी करणारी “सौ. अष्टभुजा देवी”
साष्टांग नमस्कार!
तुम्ही मला ओळखत नाही! आपला जगाला दाखवावा असा काहीही संबंध
नाही पण तरीही मी तुमची मनापासून
खूप-खूप आभारी आहे.
मी कोण? मी एक अत्यंत साधारण गृहिणी आहे? साधारण आहे किंवा
नाही...... साधारण होते किंवा असाधारण...... आता माझाचं माझ्यावरचं
विश्वास नाही! का कुणास ठाऊक एकेकाळी खूप मोठी संभावना होती की मी ही साक्षात तुमचे
रूप घ्यावे पण ती संधी माझ्या हातातून निसटून गेली आणि आज मी एक सामान्य गृहिणी म्हणून
स्वतःचा स्वीकार करण्याव्यतिरिक्त काही ही करूं शकत नाही...(किंवा आता तो उत्साह नाही...)
तुमचे अवतार घ्यावेत हीच माझी एकमेव इच्छा
होती पण ती मला पुर्ण करता आली नाही आणि आता कोणी म्हटलं
तरी ठरवलेल्या पदावरून खालच्या पदावर तुमच्या स्वरूपात मी व्यक्त व्हावं ही इच्छा आता
तर अजिबात नाही.
अजून ही तुम्ही मला ओळखलं नसावे. मी एक उच्च मध्यमवर्गीय सघन कुटुंबातील मुलगी!.... सामान्यपेक्षा थोडी छान दिसणारी, खूप लाडात वाढलेली सुदृढ अगदी मजबूत पंख असणारी, नंतर चक्क देखणी ही झाले. माझे पंख एक मोठ्ठी भरारी घ्यायला आतूर होते पण
माझ्यासाठी ठरवलेली चाकोरी मी विसरून गेले.... भरारी घ्यायचा प्रयत्न
केला तर स्वतःला इजा करून घेतली. कोणालाही दिसणार
नाहीत येवढ्या खोल जखमा माझ्या मनावर झाल्या! ही चाकोरी विसरून चालणार नाही! हे लक्षात आलं. नंतर हे ही कळलं
या चाकोरी बाहेर कसे वागावे! कसे बोलावे! कसे माणूस ओळखावे! हे मला त्यावेळी तर नक्कीच
माहीत नव्हतं. नंतर एकाप्रकारे मी दैवाला धन्यवाद सांगितले.... अनुभव नसताना भरारी घेऊन मी खरंच आगीत होरपळून
निघाले असते का? किंवा माझ्या पंखांना बळ मिळाले असते आणि मी अजून स्वंतत्र ऊंच
उडाले असते? आता हे कोणास ठाऊक!
अर्थातच पंख मजबूत करण्यासाठी माझ्या आईवडिलांनी
भरपूर काळजी घेतली.....मात्र मनातील भावना आज अनावर झाल्या आणि हे पत्र लिहिण्या
व्यतिरिक्त काही सुचलं नाही.
आता काहीच माझ्या हाती नाही. मला घडलेल्या कोणत्याही गोष्टीचा खंत नाही. मी एका सघन कुटुंबातून दुसऱ्या उत्तम कुटुंबातील सदस्य झाले. लक्ष्मी देवी आमच्या घरांवर नेहमीच प्रसन्न राहिल्या. मुलांनी उत्तम शिक्षण घेतलं, मला ही कधीचं काही कमी नव्हत...पण मनात एक हुरहूर कायम होती. कधी मी एकटी पडलें तर माझं काय होणार? खरंतर एकटी मी कधीच पडले नसते पण मनातील किंतु-परंतु कुठे संपतात? “मन चिंती ते वैरी न चिंती”. तेव्हा तुमचे स्वरूप देवीसारखे (म्हणजे माझ्या साठी तुम्ही साक्षात देवीच आहात) नेहमीच माझी पाठराखण करत होते. मी उत्तम शिक्षण घेतले आहे आणि ही संभावना की मी कधीही नौकरी करूं शकते! फक्त माझ्या साठी सुखदायक असून सगळ्यांसाठी संभाव्य होते. मी अगदी आनंदाने, उत्साहाने, उत्तम संसार केला. पुष्कळदा मनात तुम्हाला धन्यवाद द्यावेत असे येते पण कसे सांगावे हे कळत नव्हते आज नवरात्र उत्सवानिमित्त “नवदुर्गेची कृतज्ञ आठवण” म्हणून ही उत्तम संधी मिळाली.
तुमचे कर्तृत्व वाखाणण्याजोगी आहे, आत्मविश्वासी, स्वयंसिद्धा
तुमच्या ह्या रूपाला माझे शतशः प्रणाम.. अशीच तुमची प्रगती
व्हावी अश्या शुभेच्छासह.
तुमची मनापासून आभारी
अत्यंत साधारण गृहिणी साधारण आहे किंवा नाही...... साधारण होते किंवा
असाधारण.....
कळावे लोभ असावा
सौ. मीनल आनंद विद्वांस