ऑटीझम म्हणजे नेमकं काय असा प्रश्न अनेकांना पडतो.
Autism ची फोड केली तर autos म्हणजे स्वतः किँवा स्व: आणि ism स्टेट किंवा कंडिशन मराठीत ज्याला आपण स्थिती म्हणतो.
ऑटिजमचे एकंदरीत लक्षणें बघता मराठीत त्याच स्वमग्नता असं नामकरण झालेले आहे.
अशी व्यक्ती जी स्वतःमध्येच मग्न राहते.
जिला बाह्य गोष्टीशी काहीही घेणं देणं नाही.
स्वमग्नतेची साधारण लक्षणे कोणती?
१. समाजात वावरताना जे अवधान लागते त्याची कमतरता असणे.(Lack of social interaction )
२. भाषा समजण्यास अडचण असणे (Lack of Language Comprehension)
३. कुठल्याही कार्यामध्ये लक्ष केंद्रित करण्याची कमतरता (Attention Deficiency)
४. भावनिक पातळीवर संबंध जोडण्याची कमतरता (Lack of emotional attachments)
५. कुठलीही गोष्ट शिकण्यात अडचण येणे (Learning Disability)
६. उशिरा बोलणे (Speech Delay)
यात कमी बोलता येणे (minimal verbal) आणि कधीही बोलता न येणे (non verbal) असे दोन प्रकार असतात.
७. ज्ञानेंद्रियांच्या संदेशांच्या एकत्रीकरणात अडचण (Lack sensory integration)
८. वारंवार एकच कृती करण्याची सवय (Repetitive Behaviour)
९. अस्वस्थता, उत्साहाचा अभाव आणि काही प्रकारच्या आवाजांचा त्रास होणे (Anxiety, lack of motivation and sound sensitivity)
१०. काही प्रमाणात स्वतः ला किंवा इतरांना ईजा पोचवणे (self harm or can be harmful to others)
बरेचदा आपण आपल्या आजूबाजूला अशी मुलं बघतो की ज्यांना आवाज दिल्यावर ते लगेच आपल्याकडे बघत नाही. ते एकच एक प्रकारचं काहीतरी कृती करत असतात. जसे हात हलवणे, पाय हलवणे, तोंडाने एखाद्या शब्दाचा वारंवार उच्चार करणे, काही वस्तू दिले असता त्या एका रांगेत मांडून ठेवणे, आपण त्यांना काही विचारलं तर आपण जे बोललो तेच वाक्य पुन्हा उच्चारणे.
उदा:- एखाद्या मुलाला समजा आपण विचारलं," तुला काय पाहिजे?"
साधे म्हणून त्याला जे काही हवे असेल त्या वस्तूचे नाव सांगेल पण स्वमग्न मुल तेच वाक्य पुन्हा म्हणेल "तुला काय पाहिजे?"
याचे कारण म्हणजे साध्या मुलाला तुला काय पाहिजे या वाक्याचा अर्थ कळलेला आहे परंतु स्वमग्न मुलाला त्या वाक्याचा अर्थ काहीही कळलं नसल्यामुळे तो पुन्हा तेच वाक्य रिपीट करतो. कुठलीही भाषा समजण्याच्या अडचणीमुळे असं तो करतो.
त्यानंतर आपल्याला प्रश्न पडतो किंवा स्वमग्न मुलांना कसं विचारावं की त्यांना काय हवय?
त्याचं उत्तर असं आहे की त्यांना चित्र दाखवावे लागतात.
स्वमग्न मुलांना चित्रांची भाषा कळते.
चित्रांची भाषा कशी उपयुक्त होते हे आपण एका गोष्टीद्वारे समजून घेऊ :-
आदित्य आणि विक्रम हे दोन चुलत भाऊ आहेत आणि एकाच वयाचे आहेत.
आज त्यांच्या आई बाबांनी एका रेस्टॉरंट मध्ये डिनर साठी नेलेलं आहे.
आदित्य हा साधा मुलगा आहे तर विक्रम हा स्वमग्न मुलगा आहे.
आदित्य आणि विक्रम ला आवडणारे बरेच पदार्थ रेस्टॉरंट मध्ये उपलब्ध आहेत.
त्यापैकी त्यांना नेमके कोणते पदार्थ आज खायचे आहेत हे जाणून घेण्यासाठी आदित्य च्या आईने त्याला विचारले, "आदू बेटा! तू काय खाणार?
त्याने लगेच उत्तर दिले," आई, मला आज मसाला डोसा खायचा आहे "
आता विक्रमला सुद्धा काय खायचं आहे हे जाणून घेण्यासाठी त्याच्या काकूने म्हणजेच आदित्य च्या आईने विचारले, " विकी बेटा! तू काय खाणार?
विकीचे लक्ष इकडे तिकडे होते त्यामुळे त्याच्या काकूने पुन्हा तोच प्रश्न विचारला तेव्हा त्याने "विकी बेटा! तू काय खाणार? " असेच उत्तरादाखल म्हंटले.
विकीच्या काकूला पुढे काय करावं कळेना त्यामुळे त्यांनी दोन प्लेट डोसा ऑर्डर केला. डोसा येताच आदित्य ने तो आवडीने खायला सुरुवात केली पण विकीने तो डोसा नाकारला. आता सगळ्यांनाच प्रश्न पडला की विकी नेमकं खाणार काय?
आता ह्यावेळी विकीला जर चित्रांची भाषा शिकवून तरबेज केलं असतं किंवा यापुढे केलं तर त्याचे काकाकाकू किंवा आईबाबा त्याला आवडणाऱ्या पदार्थांचे चित्र दाखवून म्हणतील की तुला काय खायचं आहे? असं विचारताच तो एखादं चित्र उचलून देईल ज्यामुळे त्याला काय खायचं आहे ते कळेल.
आता चित्रांची भाषा अचानक वापरली तर त्याचा फायदा होईल का? तर त्याचे उत्तर नाही असे आहे.
घरी सुद्धा त्याला प्रश्न विचारताना किंवा त्याच्याशी संवाद साधताना शाब्दिक पर्यायापेक्षा चित्रांचा सारखा वापर केला तर त्याला कोणाशीही संवाद साधणे सोपे होईल.
चित्रांची भाषा कशी वापरायची? हे आपण पुढील भागात बघू!
धन्यवाद.