6वास्तव
===============
स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी,
खूप प्रयत्न केले,
साथीदाराने तसे वचनही दिले,
परंतू,,,,,,,
स्वप्न तुटले, अपेक्षा संपल्या,
अनं,
त्या तुटलेल्या स्वप्नांच्या,
विखुरलेल्या काचांवर.
नग्न पाऊलांनी चाललो, पाय रक्तबंबाळ,अश्रू नयनात.
स्वप्नांचे गाठोडे,
असह्य वेदना झेलून,
नव्या वाटेची,
नवीन पहाट शोधण्यासाठी.
आठवणींनो या,,,,,,,,,,,!
छळा कितीही,
समर्थ आहे, सारे घाव झेलण्यास मी,
काळाने खूप शिकवले,
लढ म्हणाला.
म्हणून लढतोय, धडपडतोय.
एकटा, आणि फक्त,,,
एकटाच,,,,,,,!!!
,,,,,,,,,,,,,,,दिनेश चव्हाण
चाळीसगाव(जळगाव)