• 01 March 2026

    भावविश्व

    धुरंधर

    0 39

    भावविश्व – कोणी कधीतरी येवढं गुंतुन जात का आपापल्या विश्वात कि त्याला कोणाचाही भान रहात नाही...... त्याला सगळेच नकोसे होतात आणि आपल्या भावनिक विश्वात त्याला कोणाचीही घुसखोरी आवडत नाही.

    होतं का असं कधीतरी? असो!

    दर शनिवारी शॉपिजेन ऍप वरून येणारं मॅसेज ‘यु हॅव पेन्डिग बुक इन योर अकाउंट’ मला भावविश्वात ओढून नेतं आज ठरवलं आहे आता पुन्हा आपल्या भावविश्वात रमायला हावं.

    आज # धुरंधर

    खरं तर आपले गुप्तहेर बाहेरच्या देशात राहून कशी कामगिरी करतात हे पाहून आपण सगळेच भारावून गेलो. किती तरी मोठे आव्हान येतात... आपण जे आहोत तसे आपण वागू शकत नाही, ते आपण कोणाला दाखवू शकत नाही आणि असं वागायचं जणू आपण आपलेच सगळ्यात मोठे शत्रू आहोत. मनाची खळबळ आणि मनातले भाव डोळ्यात दिसु द्यायचे नाहीत! त्याशिवाय संपूर्ण आयुष्य आता असंच जगायचं....देशासाठी स्वतःची ओळख विसरायची! स्वतः असणं हे पूर्णपणे संपवून! कुठेतरी खोलवर स्वतः अजून ही जगायचं अगदी विस्मय करणारी कामगिरी रणवीर सिंग या अभिनेतेने केली आहे.

    पण शेवट पाहिलं आणि मन आतून कुठेतरी हरवलं का बरं शेवटी धुरंदर असणाऱ्या आपल्या गुप्तहेराला खलनायकाचा आत्मा प्रश्नवाचक दृष्टीने पाहतोय असं दिसतं कदाचित ही ओळख आहे खऱ्या माणसाची! ज्याला ज्याचं स्वतःचं मन काही चुकीचं केल्यावर खातं. तरीही ते दृश्य मला योग्य वाटलं नाही त्या गोष्टीचा होणारा त्रास रणवीर सिंह च्या डोळ्यात दिसत होता एक अभिनेता म्हणून त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केलीही असेल पण खलनायकानी किती माणसांना मारलं असेल? काय माहिती किती निरपराध लोकांच्या जीवावर उठला असेल?त्याला त्याची जाण का नाही?मग एका अतिशय दुष्ट माणसाला शिक्षा दिल्यानंतर त्याचा आत्मा अभिनेत्यासमोर का यावा?

    दुष्टांना शिक्षा दिल्यानंतर असा त्रास होता कामा नये....असो!

    सौ. मीनल आनंद विद्वांस




    सौ. मीनल विद्वांस


Your Rating
blank-star-rating
Sorry ! No Reviews found!