• 12 January 2020

    अंधश्रद्धा

    अंधश्रद्धा

    0 52

    निरीक्षण....


    अंधश्रध्दा....


     वैशाली आहेर


     आज ट्रेन मधे बऱ्यापैकी कमी गर्दी होती...त्यामुळे बसायला  जागा मिळाली... काही वेळात..आवाज आला... सिर्फ येक्कावन रुपये बोले तो फिफ्टी वन लेती हुं... घर मे पैसा नही बाचता तो  पैसा बचेगा... शादी हो गयी  बच्चा  नही है तो बच्चा भी होगा.... किसिको जॉब नही  लग रही है तो जॉब भी मिलेगा... प्यार करने वाला भाग गया होगा तो झोली में डाल दुंगी मेरे नही बाबा जीसका है उसके झोली मे बोल रही हुं... एक तृतीयपंथी


    खात्रीशीर जोरा जोरात बोलत होती.


    अशातच कशी महिलांनी आपले कान टवकारले आणि तीच बोलण लक्ष  पूर्वक ऐकू लागल्या.. न राहून इकडे तिकडे बघून ऐकीने स्वतःचा प्रॉब्लेम सांगितला माझ्या घरात पैसा टिकत नाही .... लगेच तिने  तीच  आणि नवऱ्याच नाव विचारलं .. बोटांवर काही मोजल्यासारख केलं ..पिशवीतून काहीतरी काढल आणि लाल  कपड्याच्या चिंधी मधे बांधून दिलं..... त्या महिलेला कपाटभर पैसे मिळाल्यासारखा आनंद चेहऱ्यावर होता. 


    आता दुसरीने मुलाला नोकरी नाही म्हणून तिलाही तसच काही बांधून दिलं .... तिसरी ने मुल होत नाही म्हणून  ते घेतल ....


    हे सगळ पाहताना. मनात विचार आला काय बोलावं या महिलांना तरी मी विचारच तुमचा विश्वास आहे या सगळ्यांवर ? तर त्यातली एकजण म्हणते खर नाही वाटत पण करून बघायला काय हरकत आहे .....


     किती मोठी ही अंधश्रध्दा...


    जर असे पैसे वाढले.... नोकऱ्या लागल्या... मुलं झाली तर .... मग देशात कशाचीच कमी नसेल.


    माणूस श्रद्धाळू असला तरी 


    संकटकाळात देवाला नवस बोलणे, नवस न फेडल्यास देवाचा कोप होतो असा समज करून घेणे, भूतबाधा, मांत्रिक, भगत, भानामती, प्लँचेट यावर  विश्वास ठेवणे, दृष्ट लागणे, दृष्ट काढणे, नजर वाईट असते असे मानणे, जन्मपत्रिका, कुन्डली, रास, गृह – तारे यांची स्थिती, नियतीवाद, उपास-तापास, व्रतवैकल्ये, गंडे, दोरे, ताईत यांनी आपल्यावरील संकटांचे मोचन होईल असा विश्वास ठेवणे, शकुन- अपशकुन, शुभ-अशुभ, पाप-पुण्य, तीर्थ- प्रसाद, पूजा-अर्चा, मासिक धर्माच्या काळात स्त्रीला अपवित्र समजणे, मनुष्यरूपी कुठल्याही प्राण्यामध्ये परमेश्वराचा अंश असतो म्हणून त्याची आराधना करणे….


    आणि सर्वात महत्वाचे- ‘हे असे का? ‘ हा प्रश्न न विचारणे


    ही अंधश्रद्धा.


    महाराष्ट्राच्या सामाजिक जडणघडणीत संत परंपरा आणि फुले-शाहू-आंबेडकरादी सुधारकांची परंपरा यांचा महत्त्वाचा वाटा आहे.


     संत परंपरेने  जातिव्यवस्थेवर प्रहार केला आणि काही अंशी चमत्कार व कर्मकांडे यांना विरोध केला. दुसऱ्या बाजूला समाजसुधारकांनी कठोर धर्मचिकित्सा केलेली आहे. त्यातील कर्मकांड आणि शोषणांवर उघडपणे प्रहार केले आहेत. याच विचार परंपरेला, वारशाला महाराष्ट्र अंनिसने आपल्या परीने संघटितपणे कृतिशील करण्याचा प्रयत्न केला.


      नवस सायास करून जर मुलं होत असती तर लग्न करायची गरजच काय ? संत तुकोबा आणि गाडगेबाबा या दोघांनी अंधाश्रद्धावर कडाडून हल्ला केला. परंतु भोळा, अशिक्षित समाज मात्र अजूनही अशा अंधश्रद्धेच्या नदी लागला आहे. विविध अध्यात्मिक बुवामुळे दररोज नवनवीन अंधश्रद्धा तयार होत आहेत.


    आंधळेपणाने एखादी गोष्ट स्वीकारणे यास अंधश्रद्धा असे म्हणतात या बायका त्यापेक्षा वेगळं काय करतात? 


     जनतेमध्ये वैचारिक प्रक्रिया निर्माण होऊ शकली नाही त्यामुळे अंधश्रद्धा कायमच राहिली मला वाटतं अंधश्रद्धेविरुद्ध ची आपली लढाई अजूनही चालूच आहे जोपर्यंत सर्वसामान्य जनतेमधे वैचारिक प्रक्रिया निर्माण होत नाही तोपर्यंत ही लढाई अशीच चालू राहील. शेवटी तेवढंच म्हणावं वाटत...

    व्यर्थ गेला तुका, व्यर्थ ज्ञानेश्वर

    संतांचे पुकार, वांझ गेले.,





    वैशाली आहेर


Your Rating
blank-star-rating
Sorry ! No Reviews found!