• 12 January 2020

    मुलाखत बिग बॉस फेम अभिनेत्री रुपाली भोसले

    मुलखत बिग बॉस फेम अभिनेत्री रुपाली भोसले

    0 110

    संवाद तुमचा आमचा मध्ये.....


    बिग बॉस फेम अभिनेत्री रुपाली भोसले 


    शब्दांकन: वैशाली आहेर


    ज्या गोष्टींची आवड असते, त्या गोष्टींची मनात 

    ओढ निर्माण होते. ती ओढ  माणसाला यशाच्या दिशेने घेऊन जाते असेच काही रूपालीच्या बाबतीत घडलं.

    सर्वसामान्य कुटुंबातील लहानाची मोठी झालेली, बालपणापासून नटण्याची , मुरडण्याची आवड असलेली रूपाली तिच्या मनावर श्रीदेवीच्या

    अभिनयाचा पगडा होता..मग तिच्यासारख्या अभिनय , नृत्य..याची झलक गणेशोत्सव, शाळेचे प्रोग्राम्स ,गॅदरिंगमध्ये दिसू लागली....कळत-नकळत अभिनय क्षेत्राकडे रूपाली कशी वळाली, संघर्षमय जीवन असूनही यशापर्यंत कशी पोहोचली

    जाणून घेऊया तिच्याकडून  तिच्याच शब्दांमध्ये...

            बालपण आणि शिक्षणाबद्दल रुपाली सांगते

    माझा जन्म परळीत झालेला आहे. शिक्षणही परळी मधे, त्यानंतर आम्ही दहिसरला राहायला आलो....

    शिक्षण जास्त घेता नाही आलं कारण मी पंधरा वर्षाची होते तेव्हाच वडिलांचं निधन झालं आणि घरात मी मोठी त्यामुळे कुटुंबाची जबाबदारी अंगावर पडली

    त्यामुळे इच्छा असूनही जास्त शिकता आले नाही.

           "अभिनय क्षेत्रातील पदार्पण कधी व कसे झाले"

    या प्रवासाबद्दल रुपाली सांगते एकांकिकेच्या माध्यमातून  मी अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण केलं लहानपणापासून आवड होती पण ठरलेल नव्हते की अभिनय क्षेत्रात येईल. शाळेमध्ये डान्स कॉम्पिटिशन, एकांकिका सादर करणे या गोष्टी आवडायचे आणि जमायच ही. लहानपणी आरशासमोर जायचं नटायचं,

    ऍक्टिंग करायची, श्री देवी माझ्या आवडीची कलाकार  तिचे डान्स करायचे, 'मेरे हातो मे नौ नौ चुडिया है' यावर  मी किती वेळा नृत्य केल असेल याचा मला अंदाज नाहीये. माझा मामा दीपक शिर्के याच क्षेत्रात आहे पण  त्याच्या नावाचा उपयोग कधीही  करून घेतला नाही. मी एक नाटक केलं होत. त्यावेळेस चंदां नवरे यांच्याकडून मला उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.....त्याचवेळी  मला माझी स्वतःची ओळख निर्माण झाली आणि हो आपण करू शकतो हे मनाने  निच्छित केलं आणि आवडीचं क्षेत्र असल्यामुळे मी अभिनय करण्याचं ठरवलं.

    याच दरम्यान मी नाट्यपरिषदेशी जोडले गेले ...तेव्हा मी बॅक सीट ला काम करायचे नाट्यसंमेलन असते ये त्यावेळेस  कलाकारांना पत्र पाठवा, त्यांना निमंत्रण द्या ,त्यांची व्यवस्था बघा, स्टेजवर बुके वगैरे नेऊन द्यायची अशी छोटी-मोठी कामे करायची हे सगळं करत असताना प्रशांत दामले यांनी मला बघितल आणि त्यांनी मला विचारलं की तू नाटकात काम का नाही  करत. तू प्रयत्न कर नक्की तुला जमेल...

     मग मी म्हणाले की जर असेल काही तर सांगा मला आणि खरं तर तिथून माझा अभिनय  प्रवास खऱ्या अर्थाने सुरु झाला. माझं पहिलं व्यावसायिक नाटक आहे  'जागो मोहन प्यारे' इथून सुरुवात झाली आणि असं करता करता मध्ये दहा  नाटक कधी झाले समजले ही नाही. तेव्हा मोहन जोशी, अशोक मामा ,सतीश तारे अशा मोठ्या दिग्गज कलाकारांसोबत  मला काम करण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजते. जे काम येईल त्यामध्ये मी चांगलं काही शोधायचा प्रयत्न करत होते. हे करायचंच नाही, ते नको, असं नको, तसं नको असं कधी काही झालं नाही.

    रुपाली भोसले अनेक वर्ष चित्रपटसृष्टीत काम करतेय. मराठीबरोबरच हिंदी मालिकांमध्येही तिनं काम केलं आहे. सुमित राघवन यांच्यासोबत 'बडी दूर से आये है' ही तिची मालिका प्रचंड गाजली होती. मालिकेच्या प्रवासाबद्दल रूपाली सांगते ....

    मालिकांमध्ये मी जरा उशिरा आले मालिका आणि नाटक हे दोन्ही एकाच वेळेस शक्य होत नाही त्यांच्या वेळा, तारखा जुळत नसल्यामुळे मग कोणत तरी एकच काम आपल्याला  निवडाव लागते त्यामुळे मग मालिकांमध्ये जरा उशिरा आले.

    आवडलेल्या भूमिकांविषयी रुपाली सांगते सगळ्या भूमिका  छान मिळाल्या होत्या. तशी प्रत्येक भूमिका ही वेगळी असते त्यामुळे ती छानच असते.

     मी कधी सोज्वळ भूमिका साकारली तर कधी खास्ट सुन सुद्धा साकारली, कॉमेडी सुद्धा केलं त्यातल्या त्यात मला ,'मन उधाण वाऱ्याचे' मधली ऋतू जास्त भावली होती. 'एक झोका नियतीचा' मध्ये मनोरमा  तर 'बडी दूर से आये' मधील वर्षा , तेनाली रामा'  मधली माया याही भूमिका मनाला भावल्या.

    काम करताना  संघर्ष होता पण ती कधी जाणवला नाही या बद्दल रूपाली सांगते ... मी साम टीव्ही ला

    अँकरिंग करायचे 'सुगरण 'नावाच्या कार्यक्रमाचं काही वेळेला दिवसभर मालिकेचे शूटिंग असायचं. रात्री नाटकाचे प्रॅक्टिस असायचं मग त्यावेळेस मी दिवसभर आणि रात्री सुद्धा काम करायचे पण कामाचं कधी

    दडपण नाही आलं. जे काम वाट्याला असेल ते मनापासून चांगलं करण्याचा नेहमी  प्रयत्न केला.

    आपले आदर्श कोण याबद्दल विचारले असता रूपाली सांगते  प्रत्येक व्यक्तीकडून आपण वेगळे शिकत असतो प्रत्येकाकडे वेगळे गुण असतात वेगळी कला असते त्यामुळे प्रत्येक जण माझा आदर्श आहे असं मी मानते.

    आवडते कलाकारां विषयी सांगते श्रीदेवी मला प्रचंड आवडत होत्या, स्मिता पाटील.त्यांची जैत रे जैत  मधील भूमिका मला आजही पुन्हा कोणी करायला सांगितली तर मी आनंदाने स्वीकारेल .

    बिग बॉस च्या आठवणी बद्दल रूपाली सांगते ऐंशी दिवसाचा प्रवास होता खूप साऱ्या चांगल्या-वाईट  आठवणी आहेत. खूप छान  होता प्रवास नव्याने संधी 

      मिळाली होती त्यासाठी मी बिग बॉस आणि टीम ची  मनापासून आभारी आहे. कारण बिग बॉस मुळे मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचले.

    अभिनेत्री नसते तर काय असते असे विचारल्यास रूपाली सांगते की अभिनेत्री नसते तरी मी अभिनय क्षेत्रात लहान मोठ काहीही काम करत असते. त्या व्यतिरिक्त मला स्वयंपाकाची आवड आहे. छान छान रेसिपी बनवन आणि खाऊ घालन आवडत त्यामुळे मी कदाचित खाद्य व्यवसायात ही असते.

    नवीन प्रोजेक्ट बद्दल रूपाली सांगते 'गांधीहत्या आणि मी' या नावाचं नाटक येत आहे. सुयोग निर्मित 89 हा प्रयोग असणार आहे २० डिसेंबर ला ते प्रेक्षकांच्या समोर येईल त्यामध्ये मी सिंधू गोडसे  ची व्यक्तिरेखा साकारतेय... राम दीपच्या वाचकांना मी आवर्जुन सांगेल 'गांधीहत्या आणि मी नक्की बघा'. 

    यशस्वी जीवनाचं रहस्य याबद्दल रूपाली  सांगते नेहमी सकारात्मक विचार करा  आणि जीवन सुंदर  आहे  ते आनंदाने जगा.

    रूपालीचा सामाजिक संदेश आहे स्वतः जगा आणि  इतरांनाही जगू द्या. संपूर्ण माहिती असल्याखेरीज इतरांविषयी वाईट भाष्य करू नका.

    माणसाने माणसाशी माणसासारखे वागावं.

    धन्यवाद रूपाली तुझ्या व्यस्त वेळेतून राम दीप साठी वेळ दिल्याबद्दल.

    रुपालीच्या पुढील वाटचालीस  शुभेच्छा देऊन मुलाखतीस पूर्णविराम.. !




    वैशाली आहेर


Your Rating
blank-star-rating
Sorry ! No Reviews found!