प्रतिबिंब” -माझा शब्दसंग्रह- २०१३
“तरंग मनाचे” – २०१४
“ओंजळ”- २०१५
“प्रांजळ”- २०१७
“तारेवरची कसरत” अनुभवकथन- २०१९
“शिवरायांचे एकनिष्ठ शिलेदार, वीर येसाजी कामठे” - ऐतिहासिक पुस्तिका २०२०
"अनोख्या रेशिमगाठी" कादंबरी -२०२२
प्रकाशनाच्या वाटेवर असलेली पुस्तके,
“प्रवास कवितेचा” कवितेचा अनुभव,
“प्रेमाचं कोडं” (प्रेम कथा),
“शहाणपण देगा देवा” (बाल-कुमार कथा), “कौतुकार्पण” – काही निवडक पुस्तकांचे परीक्षण करून लिहिलेलं मनोगत, “समर्पण”-चपराक मध्ये प्रसिद्ध झालेल्या निवडक लेखांचे एकत्रीकरण,
“बोलके फोटो”-माझ्या कवितेतील चारोळीवर समर्पक फोटोतून व्यक्त केलेल्या भावना.
माझ्या “प्रांजळ” ह्या काव्यसंग्रहामधील ६ कविता अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ, वर्धा ह्यांनी नागपूर येथे फेब्रुवारी २०१६ मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलना निमित्त प्रकाशित केलेल्या “कणसातली माणसं” ह्या प्रातिनिधिक काव्यसंग्रहामध्ये प्रकाशित केल्या आहेत.
तसेच माझ्या “बळीराजा” ह्या कवितेला वर्धा येथे फेब्रुवारी २०१५ ला झालेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनात प्रथम पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
“हक्क जगण्याचे वंचित होते” ह्या कवितेस फेब्रुवारी २०१६मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनात पुरस्कार देवून गौरविले आहे.
फेब्रुवारी २०१७ च्या मुबईत झालेल्या अखिल भारतीय मराठी शेतकरी संमेलनात सुध्दा माझ्या “मागोवा” ह्या सदरामध्ये मी लिहिलेला शेतकरी संमेलनाच्या मागोवास प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.
“विळखा कर्जाचा” ह्या कवितेला, अलिबाग येथे झालेल्या सहाव्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनात तृतीय पुरस्कार देवून गौरवण्यात आले आहे.
मसुरी येथिल "कुकुएफएम" ह्या रेडिओवर माझे वीर येसाजी कामठे आणि तारेवरची कसरत आँडिओत प्रसारीत करण्यात आले आहे.