आज दिनांक ८ जानेवारी २०२२ रोजी सृजन-उर्मी' वर्षपूर्ती विशेषांकाचे प्रकाशन सुप्रसिद्ध कवी रेणू पाचपोर यांच्या हस्ते व कवी मोहन कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. येथील बहुतांशी शिलेदार हे कवितेसोबत ललित,कथा, नाटक व इतर विविध प्रांतात दर्जेदार लेखन करतात पण हे पुरेसे नाही अजून खूप मोठा पल्ला साहित्यक्षेत्रात गाठायचा आहे;तो पंखातील बळ व एकविचारी सामर्थ्यांनी आम्ही नक्की पादाक्रांत करू व यशोशिखरावर जाऊ असा विश्वास वाटतो. .