Nishikant Kochkar - (19 July 2025)निसर्गाने केले आत्मचिंतन दिसले साम्य त्याला मानवाशी ग्रीष्म,श्रावण,शिशिर अनुभवणे बाल्य,युवा,वृद्धापकाळाशी अनेक वर्षात मानव दिशा बदलतो निसर्ग एका वर्षात सर्व अनुभवतो निसर्ग आहे एक मौन भाष्य मौनातून शिकवितो कराया संवाद सूर्य रोज रोज उगवतो पण तो उठतो की जागा करतो झाडं पण उगम घेतात कोणते स्वप्न आहे त्यांच्या मुळात हेतुपंथस्थ पक्षी आपल्या पंखांनी लिहितो भविष्य अनवरत,अविवश,आकाशाला भिडायला करतो धाडस अकल्पित क्षितिजाकडे झेपावतो एक अपूर्ण, अमूर्त विचार निसर्ग आणि मानव दोघे सारखे पण त्यात आहे एक क्षण अनाकार निसर्ग पानाफुलांचा देखावा नाही तो आहे अंतर्मनाचा वारसा पौर्णिमा जितकी वास्तव तेवढीच अमावस्या प्रतिकात्मक अनुभव मृत्युच्या प्रवासा.