*परिचय पत्र*
श्री पुरुषोत्तम रामकृष्ण हिंगणकर
कालवाडी ता अकोट जीं अकोला,
ह मु चिखली पुणे
श्रमसाफल्य हौसिंग सोसायटी फ्लॅट 403, बी. बी 23, सेक्टर न 17-19 घरकुल चिखली पुणे 62.
शिक्षण :- ( B A संस्कृत )
१) श्री काळेश्वर ग्राम संस्थे आसू साताऱ्याचा स्वदेशी भारत पुरस्कार 2021 सन्मानीत प्रकाशजी सकुंडे...More
*परिचय पत्र*
श्री पुरुषोत्तम रामकृष्ण हिंगणकर
कालवाडी ता अकोट जीं अकोला,
ह मु चिखली पुणे
श्रमसाफल्य हौसिंग सोसायटी फ्लॅट 403, बी. बी 23, सेक्टर न 17-19 घरकुल चिखली पुणे 62.
शिक्षण :- ( B A संस्कृत )
१) श्री काळेश्वर ग्राम संस्थे आसू साताऱ्याचा स्वदेशी भारत पुरस्कार 2021 सन्मानीत प्रकाशजी सकुंडे द्वारा,
२) झुंज दिव्यांग संस्था चिखली पुणे द्वारा, अपंग विवाह सोहळ्यात समाज सेवा सन्मान 2021 तृप्ती देसाई सावित्री ब्रिगेड पुणे यांचे हस्ते स्वीकार.
३) इंद्रायणी साहित्य सेवा रत्न पुरस्कार 2021 पद्मभूषण श्री जयंत ओक मुंबई यांचे हस्ते
४) तेजभूषण बहुउद्देशीय संस्था तेजभूषण सन्मान 2021 डॉ खं र माळवे वर्ल्ड पार्लमेंट सदस्य अमेरिका हस्ते साहित्य संमेलन प्रसंगी आळंदी दे येथे
५) नक्षत्राच देणं काव्य सन्मान 2021 काव्य सन्मान
६) कोविड योद्धा कार्य सन्मान 2020 - 2021 विश्व वारकरी सेना महाराष्ट्र राज्य
७) दैनिक राष्ट्र सह्याद्री द्वारा, राष्ट्र निर्माण सन्मान2021
८) पर्यावरण व पर्यटन बहुउद्देशीय संस्थेद्वारा आयोजित राळेगणं सिद्धी येथे पद्मभूषण समाज रत्न अन्ना हजारे यांचे हस्ते राष्ट्रीय पर्यावरण सन्मान पुरस्कार 2022
९) काव्यमित्र संस्था पुणेचा राष्ट्रीय समाज भूषण पुरस्कार 2022
१०) विश्व संत नामदेव महाराज साहित्य रत्न पुरस्कार 2023 (शब्दवेधी बाणाक्षरी साहित्य समूह पुणे द्वारा प्राप्त )
११)आंतरराष्ट्रीय साहित्य कवी पुरस्कार उत्क्रांती हायस्कुल जरुड जी. अमरावती 2023
.
१२) वारकरी साहित्य पुरस्कार 2023
(वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य.)
तसेच 1000 हजारोच्या संख्येत ऑनलाईन काव्य सन्मान वाट्याला आले आहेत.
पुस्तकं प्रकाशित
1) वासुदेव पासष्टी हिंदी संस्कृत मराठी काव्य
( श्लोक - स्तवन, अभंग ओवीबद्ध )अश्या त्रिवेणी सांगामातील पुस्तकं आहे.
सर्वात मोठे एक आत्म निर्झर लिखाण चालूच आहे त्यात सर्वं काव्याचे प्रकार वाचायला मिळतील.
साहित्य,कला समाज सेवा, आणि पर्यावरण सेवा नदी संवर्धन स्वच्छता अभियान इत्यादी सर्वं माझ्या अनेक समाज उपयोगी कार्याचा आढावा घेऊन काव्य मित्र यां संस्थेने पुणे माझी निवड करून राष्ट्रीय समाज भूषण पुरस्कार 2022 दिला आहे.
माझ्या जीवनात अनेक सेवा करण्याची संधी मला प्राप्त झाल्या बद्दल ईश्वराचे मि सर्वं प्रथम आभार मानेल.
श्री संत गजानन महाराज संस्थांन शेगावचे अध्यक्ष शिवशंकरभाऊ पाटील यांचे स्मृती प्रित्यर्थ विश्व वारकरी सेना वं अखिल भारतीय वैष्णव कला साहित्य मंच पुणेच्या माध्यमातून महाराष्ट्र व देशभऱ्यात कोविड ने थैमान घातले तेव्हा सर्वं महाराष्ट्रात ऑनलाईन मार्गदर्शन करून झाडाची लागवड केली तसेच ज्या जोग महाराज कृतं वारकरी शिक्षण संस्थेतून अध्यात्मिक आणि समाज सेवेचा वसा घेवून आम्ही कीर्तनकार प्रवचनकार होऊन 1984-85 साली आम्ही बाहेर पडलो त्या नंतर अनेक गावो गावी कीर्तन प्रवचने करून त्याचे जीवनास सार्थकता मिळाल्याचे आज समाधान मिळतं आहे 16 एप्रिल 2021 पासून नॉनस्टॉप साहित्य सेवा अखिल भारतीय वैष्णव कला साहित्य पुणेच्या माध्यमातून अविरतपणे कवी घडविण्याचे अनेक कार्य करीत आहोत.जीवनात अनेक चढ उतार पाहत अनेक साहित्यिक घडविण्यात यशस्वी झालो आता पर्यंत अनेकं ऑनलाईन उपक्रम राबवून देश विदेशातील मराठी साहित्यिक घडविण्याचे कार्य ऑनलाईन अविरतपणे अव्याहत चालू आहे त्या बद्दल all सोशल मीडिया अग्रगण्य फेसबुक व्हाट्सअप, कुटुंब app, koo-app, शेअर चॅट, इंस्टाग्राम आदी माध्यमातून सर्वंत्र पाहता कार्याचा आढावा आपणांस आल्याशिवाय राहणार नाही तसेच श्रमदान करून पर्यावरणाचे दृष्टीने झाडें लावणे नदी इंद्रायणी स्वच्छ करने त्या साठी जन जागृती इंद्रायणी सेवा फाउंडेशन च्या माध्यमातून काव्य स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा, व स्वच्छता अभियान घेऊन उत्कृष्ठ कार्य करण्याची आणि कीर्तन प्रवचणाच्या माध्यमातून प्रबोधनाची अविरत सेवा ईश्वर कृपें आमचे हातून संत ज्ञानोबा तुकोबा माउलीं करून घेत आहेत त्याचे मनास समाधान प्राप्त झाले.
त्याचं प्रमाणे काही संघटना संस्थेचा कार्यकारी सभासद
. इंद्रायणी सेवा फाउंडेशन कार्याध्यक्ष यां माध्यमातून इंद्रायणी स्वछतेसाठी अनेक कार्यक्रम केले.
साहित्य सेवेतून समाज प्रबोधन करीता अनेक अभंग आणि इतर अनेक कवितेची निर्मिती करून प्रबोधन केले तसेच झाडें लावण्याचे कार्यक्रम हाती घेऊन वारकरी शिक्षण संस्थेत जोग महाराज जयंती निमित्त 700 झाडें लावलेत आणि सिद्धबेट इथेही 1000 झाडें लावण्यासाठी तरुणांना प्रेरित करून अनेक उपक्रम चालवले जेणे करून सिद्धबेट पाहून प्रत्येकाला आनंद वाटला पाहिजे असे आळंदी नगर परिषद मुख्य प्रशासन अधिकारी श्री कैलासजीं केंद्रे यांचे सहकार्याने नगर पालिके मार्फत अनेक उपक्रम राबविले आहेत.
1) *संस्थापक अध्यक्ष* :- अखिल भारतीय वैष्णव कला साहित्य मंच पुणे
2) *कार्याध्यक्ष* :- इंद्रायणी सेवा फाउंडेशन अलंकापूर पुणे
3) *प्रदेशाध्यक्ष* :- जय महाकाल भक्त्त सेना महाराष्ट्र
4) *राष्ट्रीय प्रवक्ता प्रमुख* :- विश्व वारकरी सेना महाराष्ट्र
5) *पुणे जिल्हाध्यक्ष :-* हिंदू रक्षक धर्मं परिषद संघटना महाराष्ट्र.
6) *सदस्य* :- राष्ट्रीय पर्यावरण वं पर्यटन बहुउद्देशीय संस्था भारत.
७) अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र, युवा क्रांती फाउंडेशन द्वारा संचलित (पोलीस मित्र,पत्रकार सुरक्षा, माहितीचा अधिकार संघटना.)
इत्यादी संघटना व संस्थेच्या माध्यमातून अनेक कार्य करण्याची संधी प्राप्त होते ती मनाला खुप समाधान देते.