मी, सर्जेराव कुइगडे. माझा जन्म दि. २३/१२/१९४४ रोजी कोल्हापुरात झाला. वाणिज्य शाखेच्या पदवीपर्यंतचे शिक्षण आणि स्टेट ट्रान्सपोर्ट को-आॅप. बँकेतील नोकरीची सुरुवातही कोल्हापूरातूनच झाली. अनेक ठिकाणी बदल्या होत, १९९० मध्ये जनरल मॅनेजर पदावर मुंबईत आलो. २००३ मध्ये सेवानिवृत्त झालो. आता...More
मी, सर्जेराव कुइगडे. माझा जन्म दि. २३/१२/१९४४ रोजी कोल्हापुरात झाला. वाणिज्य शाखेच्या पदवीपर्यंतचे शिक्षण आणि स्टेट ट्रान्सपोर्ट को-आॅप. बँकेतील नोकरीची सुरुवातही कोल्हापूरातूनच झाली. अनेक ठिकाणी बदल्या होत, १९९० मध्ये जनरल मॅनेजर पदावर मुंबईत आलो. २००३ मध्ये सेवानिवृत्त झालो. आता मी नेरूळ, नवी मुंबईत स्थायिक झालो आहे.
मला वाचन, लेखनाची आवड असूनही नोकरीच्या काळात हातून काहीही लिखाण झाले नाही. निवृत्तीनंतर वर्तमानपत्रातून काही स्फुट लेखन केले. २००८ मध्ये मुंबईवर पाकिस्तानी अतिरेक्यांनी हल्ला केला. त्या हल्ल्याचा लेखा-जोखा सांगणारे 'मुंबई २६/११ एका हादसा ' हे पुस्तक लिहून एप्रिल २०१० मध्ये प्रकाशित केले. या पुस्तकास महाराष्ट्र राज्याचे माजी पोलिस महा संचालक कै. अरविंद इनामदार यांची प्रस्तावना लाभली आहे. या पुस्तकाच्या दोन आवृत्त्या निघाल्या.
हिंदु धर्मातील तत्वज्ञान, धर्मग्रंथ, देव-देवता, ईश्वराप्रत नेणारे अनेक मार्ग, धर्माचरण, यासंबंधातील सर्वस्पर्शी धर्म ओळख सांगणारे ' असा आहे हिंदु धर्म ' हे माझे दुसरे पुस्तक डिसेंबर २०१३ मध्ये अक्षर दीप प्रकाशन, कोल्हापूर यांनी प्रसिद्ध केले.
कवी कुसुमाग्रज सार्वजनिक वाचनालय संस्था, नवी मुंबई द्वारा प्रकाशित होणाऱ्या संवाद या पत्राचे संपादनही मी काही काळ केले. चिंतन पुष्पावती व राजकीय डावपेच या दिवाळी अंकांचा कार्यकारी संपादक म्हणून गेली काही वर्षे कार्यभार सांभाळत आहे.
मला सामाजिक कार्याची आवड आहे. चित्रकला व गायन यात मला विशेष रुची आहे. जलरंगात अनेक व्यक्तिचित्रे केली आहेत.