मी सौ. सुलोचना बेलापुरकर रिटा. अनुभाग अधिकारी मप्र.वि.मं.देवास ,कला संगीत ,नृत्य , स्टेज आर्ट व ड्राइंग डिजाइनिग साहित्य ,लिखाण ,वाचन , इत्यादि ची आवड .
मी सौ. सुलोचना बेलापुरकर रिटा. अनुभाग अधिकारी मप्र.वि.मं.देवास ,कला संगीत ,नृत्य , स्टेज आर्ट व ड्राइंग डिजाइनिग साहित्य ,लिखाण ,वाचन , इत्यादि ची आवड .
Book Summary
रंग माझा वेगळा
आया होली का त्यौहार हुई रंग की बौछार ......
हे गाणं जेव्हा कानावर पडतं तेव्हा जणु जगातील सारेच रंग खरोखर फौव्वा-या च्या रुपे सर्व दूर उडताना दिसत आहे असा भास खरोखर मनाला होतो , आणी नुसत्या त्या आभासां नेच मन आणी शरीर थय थय थिरकायला होतं ,आणी होळी रंगपंचमी च्या दिवशी तर तो खरोखर प्रफुल्लित मनावर ठसे च्या ठसे सोडूनच जातो .
" रंग " रंगावीण दुनिया शून्य आहे , प्रकृती च्या पर्वणी ला बघता इश्वरा ची किमया दिसून येते किती तरी वेगळे वेगळे रंग आणी तेही अजून विविध शेड ( मिसळ रंग) मध्ये दिसून येतात जणु एखाद्या प्रख्यात प्रवीण कलाकारा ने आपल्या तूलिके ने स्वतः नैसर्गिक रंग पृथ्वी व आकाश भर पसरविले आहेत , अर्थात हा प्रख्यात कालाकार म्हणजे नक्कीच आपला पर्जन्य वर्धक निसर्गच आहे .
कुठं अरुणोदय समयी गोड गाढ झोपेतून उठून गुलाबी रंगा पासून राघववेळी ची रंगारंग सुरुवात,मग केशरी प्रफुल्लित आनंदित रंग बरोबर सोनेरी सोनसळ्या चा किरणांचा पृथ्वी वर समागम , तो लाल बुंद सुर्य जणू आभाळा वर ठळक कुंववा चा ठसा , हळू हळू हिरण्यवर्ण सोनेरी गोल वर्तूळ त्या वर वृत्ता कार मोर पीसी रंग आणी सोनेरी चमचमणाऱ्या त्या सहस्त्र किरण , इतर कोणते मर्म वर्ण ह्या पुढे खरे ठरणार ?
इकडे धरे वर सावळ्या व धवल रंगा सोबत तांम्बडा रंग प्रति छाये च्या रुपे सरिते सागरे संथ पाण्यावर प्रतिबिम्बित होतोय , त्या सोबत ताम्बड्या शुभ्र पांढर्या सुरेख रंग बेरंगी कलगी असलेल्या व केशरी लाल चोंच असलेल्या कोम्बड्या , उगवत्या दिशे ला पाहून जगभराला उठायची साद देत आहेत , रंग बेरंग्या सुंदर आणी तर्हेवाईक फुल पाखरू , आनंदाने एका फुलावरून दुसऱ्या फुलावर मधुगंध व मधुपराग चा आस्वाद घेत आहे , जणु सुरेख रमणीय रंगबेरंगी , आकर्षक दोघे , फुलं आणी फुलपाखरु , सुप्रभाते महकत चहकत एका मेंकानां कड -कडून मिठी मारताहेत कि काय !
हिरव्या गर्द वृक्षावर हिरवी गार पल्लवे वृक्षा च्या वंशा प्रमाणे छोटी मोठी वेगवेगळ्या आकर्षक आकारची वार्या च्या हळूवार झुळके ने सानंदे डौलत आहेत च , पण त्यावर ही अपलीं घरकुले बांधणारी छोटी शी लहान शी सांवळी शी चिमणी , रंगीत टिटवी , कोकीळा, पोपटी राघुमैना , आणी नीळकंठी पक्षी , पांढरी व ढगाळ कबूतरं , काळं शार कांवळ , निरनिराळ्या आकारा चे व रंगतदार लहान सहान पक्षी त्यांचा चिवचिचिवाट , जणू त्यांचे रंगतदार विश्वच त्यां निरनिराळ्या वृक्षांवर असावे,
इकडे हिरवा गार मखमली गालिचा , दव बिंदूं च्या तृणांकुराने भरलेला , आणी आजू बाजू विविध सुंदर व आकर्षक रंगां ची फुल बागा मखमली गालीच्या चा बुटेदार किनार कोट , काय सांगावी ह्यां अप्रतीम निसर्ग सौंदर्य रंगांची जणु रंगपंचमी धरे वर निसर्ग रंग उधळत आहे , पुढं भिन्न विभिन्न वटवृक्क्षां वर प्रत्येका चा प्रकृती आणी नियमित वेळे प्रमाणे विविध रंगांची फुलं उपरांत धरे वर पेंडूलम सारखी लोंबणारी विविध रंग व आकारां ची खाद्य फळे त्यांचे सौंदर्य तर डोळे भरून पहावे असे नसूत तर ते पोट भर खाऊन आपली प्रकृती चिरंतर अक्षय उत्तम ठेवावी अशी आहेत ,
आता ह्याचे रंग सांगून काय उपयोग तेच हिरवे :- पपई, आम्बा , पिवळं पपई , आम्बा संत्री , लिंबू तांम्बड :-, चिकू शेवफळ लाल , बोरं डाळिंम्ब कलिंगड लाल चेरी आलू बुखारा कत्थई:- , कौठ जांभूळ अंजीर जर्दाळू पोपटी :- , सफरचंद आंवळा द्राक्षं पीच सीताफळ रामफळ किती तरी नांव घ्यावी आणी किती सोडावी अनंत रंगा ची फळं आणी फुलं .
मधोमध वर्तुळाकार निळ्या शार पाण्या चा फौव्वारा अजून त्या वातावरणा ची शोभा वाढवून पांढर्या रंगा ची बौछारं / झरंण उडवित आहेच . म्हणजे आपल्या बायांच्या हळद कुंकु सोहळ्यात जणु अंतर आणी गुलाबदाणी शिंपंडण .
निळसर पाणरंगी तळव्या, तलावा व छोट्या वा मोठ्या नदी पाटांवर , पांढरे शुभ्र बगळे त्यांची सोनेरी चोंच तसे च शतूर्मुग इकडे तिकडे फिरत वातावरणाचे सौंदर्य निश्चित आल्हाद दायक करित आहेत . पाण्या च्या आत विविध प्रकार च्या आकर्षक व सुरेख रंगबेरंगी मासोळ्या सळ सळ करित धावत आहेत , ह्यात तर पांढरा सोनेरी लाल गुलाबी हिरवट पिवळट , तांम्बडा काळा , धुरकट कोणते म्हणून रंग सांगावे व सोडावे ? हेच कळत नाही , पुन्हा अजून खाली पाण्या च्या खोल , विविध रंगांचे म्हणजे पांढरे , सावळे ,हिरवे गर्द हिरवे , मातकट कत्थई निरनिराळे शैवाळ , पांढरे ताम्बडे , गुलाबी शंख आणी शिंपल्या विविध रंगांचे इतर सरपट प्राणी, कांसवें इत्यादी समुद्री सौंदर्या ची काय कमी आहे कां ? कांसवा वरून लक्षात आलं रात्री जसे वृक्षां वर प्रकाश पुंज कांजवे असतात तशे पाण्यात ही प्रकाश पुंज कीट असतात .
हे झालं धरा अंबर व नीर ह्यांच्या वर निसर्गा द्वारे उधळले जाणारे रंग .
इंद्र धनुष्य हा आकाशा वरचा एक अप्रतीम रमणीय व नैसर्गिक सोहळाच आहे , क्षणाधार्त सारे शीण क्षीण विसरायला लावणारा , जणू स्वर्गा तून भूवासियां साठी निघालेला एक नवलाचार .
अशे अनेक आणी अनंत रंग आपल्या रोजच्या जिवनांत ही येतात दिसतात आणी अल्हाद देऊन जातात , आपल्या लक्षात ही नसतें , आणी खरं तर त्यामुळेच तर आपलं जगणं निसर्गा बरोबर एका अदृष्य कलर वाइब्रेशन थेरॅपी ने जुडले ले आहे , म्हणून च प्रत्येक जीवा ला जीवन जगण सहज व सोपं जात .
कुठं कुंठे तर कांही प्राणी स्वयं रक्षा करिता आपला रंग नैसर्गिक रित्या आजू बाजूच्या निसर्ग रंगा प्रमाणे बदलून घेतात हे ही रंगा चा एक अजब च संगम आहे .
अजून ही घरघुती कारणे ही खूप से अशे कांही रंग इश्वर व निसर्ग प्रदत्त आहेत जेणे करून आपले जीवन फारच अप्रतीम व सहज सरळ झालेलं आहे , विविध रंग आणी रंग पद्धती एक असा मार्ग आहे , जो निराश झालेल्या व्यक्ती ला पुनर्जिवन देऊ शकतोच आणी साधारण व्यक्ती ला त्याच्या प्रशस्ती चे मार्ग मोकळ करतो .
तर आहे अशी रंगाची किमया ह्यात माझा रंग खरोखर वेगळा असा म्हणावेसे वाटंत नाही , संगळेच रंग माझें , रंगा वीण सारे भंग .
रंग नसते तर फक्त श्वेत व श्यामल दिसले असते , तेथे निसर्गां ने जवळ जवळ पाहाण्यात खाण्यात पिण्यात आणी जिवनात विषेश रंग भरून दिलेत तर या निसर्गां चे किती ही कृतार्थ व्हावे तरि त्यात न्यूनच रहाणार , पूर्ण कृतार्थ कसे व्हावे हा एक मोठा अनंत प्रश्न आहे .
रंगात रंग भरले श्रीरंगाने ,
त्यात श्रीरंग रंगात आला ,
रंगात श्रीरंग कि श्रीरंगात रंग
हे आता कळेनासा झाला .