ऋजुता देशमुख - (29 October 2022)सण उत्सव साजरे करताना नव्या पिढीने साधलेला सुवर्णमध्य लेखात अधोरेखित झालेला आहे. सुंदर लेख 👍👌❤️
00
भालचंद्र चितळे - (29 October 2022)मस्त लेख आहे. ही दिवाळी, ती साजरी करण्याचे कारण, आजच्या पिढीला, थॅंक्सगिव्हिंग सांगितले तर कळणार. कालमानपरत्वे बदल होतातच पण, आनंद साजरा करण्याचे कारण आणि तोही एकत्रितपणे, हा मूळ भाव तोच राहिला आहे. राहो. आमच्या चिपळूण च्या घरातली दिवाळी आठवली. लेखन इतके ओघवते आहे की तो वाडा, सर्वोत्कृष्ट साडी बघून खुललेली आई, पोरींच्या आनंदासाठी पहाटे पासून राबणारी आई, सगळं मी पाहू शकलो. छानच. नोकरी करणाऱ्या बाईच्या उल्लेखावरुन एक विचार मनात आला. त्या स्त्री ची हेटाळणी करणाऱ्या पण स्त्रियाच होत्या. सासू सून, हे पण स्त्रियाच करतात. दिवाळीत, किंवा एरवीही, घराचा स्वर्ग करणारे स्त्री चे ममत्व, मृदुलता, परोपकारी स्वभाव, स्वतः जळून इतरांना उजेड देणारे मन, अशा प्रसंगात कटू, क्रूर, भावनाहीन का होते? हे मात्र एक अगम्य कोडे आहे. असो. कुठल्या तरी दिवाळीत, एखादा दीप, ह्यावर नक्की उजेड पाडेल. छान आठवणींना उजाळा दिल्याबद्दल लेखिकेला धन्यवाद
00
Shubhangi Deshpande - (28 October 2022)लेख वाचून परत लहान व्हावसं वाटलं. पुन:प्रत्ययाचा आनंद मिळाला.नवीन पिढीकडून नव्या जुन्याचा संगम आत्मसात केला तर खऱ्या अर्थाने प्रत्येक दिवस दिवाळीसारखा उजळून निघेल.
00
Gangadhar joshi - (28 October 2022)छान। दोन पिढयतील अंतर सजगता