सौ. भारती दिलीप सावंत
खारघर, नवी मुंबई
शॉपिझेनकडून 51 पुस्तके प्रकाशित
Book Summary
महाराष्ट्राला संतांची थोर परंपरा लाभली आहे. सर्वसामान्य लोकांचा देव विठूमाऊली असून तो त्यांच्या हाकेला धावून येतो. विठूचरणी लीन होण्यासाठी चातुर्वर्ण्य समाजातील भक्त मंडळी आषाढी वारी करतात. हरीनामाचा गजर करत भगवी पताका खांद्यावर घेऊन अनवाणी पायांनी पंढरीला जातात. पंढरीच्या राजाला आपले गाऱ्हाणे ऐकवतात. विठू आपल्या भक्तांची कामना पूर्ण करतो. त्यांच्या संकटात धावून येतो. ही भक्तमंडळी अभंग, कीर्तनातून विठूची महती सांगतात. अशा या भोळ्या भक्तांचा कानडा विठ्ठलू अठ्ठावीस युगे कर कटेवरी ठेवून पंढरीत उभा आहे.