सौ. भारती दिलीप सावंत
खारघर, नवी मुंबई
शॉपिझेनकडून 51 पुस्तके प्रकाशित
Book Summary
आपल्या जीवनात देवदेवतांना महत्वाचे स्थान आहे. हिंदुधर्मात श्रीकृष्णाची पुजाअर्चा केली जाते. त्याचा जन्मदिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. दहीहंडी उभारून तरुण-तरुणींकडून त्या फोडल्या जातात. मथुरेचा कान्हा सर्वांचाच लाडका! खोड्या करून गोपगोपिकांना सतवणारा म्हणून तो प्रसिद्ध आहे. देवकी ही जन्मदात्री आणि यशोदा ही पालनकर्ती अशा दोन आया त्याला लाभल्या आहेत. नंदराजाच्या नटखट लल्लाविषयी जितके लिहावे तितके कमीच! राधेचा प्रेमी, रूक्मिणी, सुभद्रेचा पती, सुदामाचा बालमित्र, अर्जुनाचा मित्र आणि द्वारकेचा राजा जनमाणसांत कृष्ण म्हणुन पुजनीय आहे.