प्रतिभावंत कवी गोविंदाग्रज ऊर्फ राम गणेश गडकरी यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून रविवार दि.२६ मे २०२४ रोजी मराठी संग्रहालय ठाणे येथे हायकू बहर (अजित महाडकर), पदन्यास (विजय फडणीस), काव्यसंपदा (संपदा देशपांडे), घननीळ (आश्लेषा राजे) व मैत्र शब्दसूरांचे (स्वाती दोंदे) या पाच काव्यसंग्रहांचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक दिलीप गडकरी यांच्या हस्ते झाले.
यातील हायकू बहर (अजित महाडकर), काव्यसंपदा (संपदा देशपांडे), घननीळ (आश्लेषा राजे) व मैत्र शब्दसूरांचे (स्वाती दोंदे) हे चार कवितासंग्रह शॉपिजन प्रकाशन संस्थेने प्रकाशित केले आहेत.
या प्रकाशन सोहळ्याची दखल ठाणे वैभव, ठाणे वार्ता, जनमत, पुण्यनगरी या वृत्तपत्रांनी घेतली. त्यांचे आभार.