Seema Puranik - (09 May 2022)अत्यंत निरागस आणि शिकवण देणारी कथा
00
उज्वला कर्पे - (07 May 2022)खरं आहे आपणही आपणास न लागणारं बरच सामान घेतो ज्याचा कधीही उपयोग करत नाही, कामाची वस्तू खरेदी करताना विचार करून खरेदी करावी, अशी शिकवण या गोष्टीत आईने मुलाला दिली आहे.
नमस्कार,*_
आताच्या या चंगळवादी संस्कृतीत संस्कार मागे पडत चालले आहेत. 'फक्त आज काय ते' हेच जीवनाचे मर्म बऱ्याच काही लोकांसाठी आहे. खरं तर उद्याचा विचार महत्वाचा आहे, कारण आज काय आहे ते आपण पहात आहोत पण उद्या काय ते डोळ्यांना दिसत नाही. म्हणून जीवनात कोणतेही पाऊल उचलण्यापुर्वी विचार हा व्हायला हवा की त्याचे जीवनात काय परिणाम होतील, आपल्यासाठी ते किती आवश्यक आहे? आणि हे येईल बालपणापासून आपल्यावर झालेल्या संस्कारा़मधून. संस्कारांची गरज जशी श्रीमंतांना आहे तशी गरीबांना ही आहे व हे फक्त घरातून दिल्याने लवकर रुजतील. शालेय अभ्यासक्रमातही ते सामील झाले तर बऱ्याचशा सामाजिक समस्यांचे समाधान होईल.
अशाच संस्कारांमुळे गरीब परिवारातील मुलाचे कसे मतपरिवर्तन झाले ते सौ. राधिका माजगावकर पंडित यांच्या आजच्या कथेतून निदर्शनास येते.
_-मेघःशाम सोनवणे._