आजतागायत 36 पुस्तके प्रकाशन
कथा, कादंबरी, समीक्षा, लेख, कविता.
Book Summary
“कुरकुरे.., पापडी.., नमकीन.., चनामसाला.... पाणी बॉटल....”
बऱ्याच वेळापासून ओरडून-ओरडून घशाला कोरड आली होती. आज पॅसेंजरमध्ये गर्दी नसल्याने फारसा धंदाही झाला नव्हता. केव्हा-केव्हा असंच व्हायचं. नुकतेच पावसाचे दिवस असल्याने प्रवाशांची गर्दी कमीच असायची. त्यातल्या त्यात लहान मुलंबाळं असली की आमच्या धंद्याला तेजी असायची.
‘गोंदिया-बल्लारशा पॅसेंजर प्लॅटफॉर्म नंबर एकवर येत आहे....’