दिवस विशेष म्हणजे व्यक्ती, कुटुंबे, संस्था, सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक गट, राष्ट्र यांच्या दृष्टीने संस्मरणीय असलेले दिवस. व्यक्तिगत
जीवनाप्रमाणेच सामाजिक जीवनात अनेक संस्मरणीय प्रसंग, घटना घडत असतात. अशा प्रसंगांची सुखदायक किंवा स्फूर्तिदायक आठवण म्हणून राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय पातळीवर ते ते दिवस विशेष महत्वाचे मानले जातात.
इतिहासातली जागतिक दिवस, ठळक घटना , जयंती , पुण्य तिथी , सामाजिक - भौगोलिक - नैसर्गिक घडामोडी या अनुषंगाने प्रत्येक दिवसाचे एक महत्व अधोरेखित केलेले असते. नवीन पिढीला ह्या सर्व घटनांची माहिती असावी ,
यासाठी हे पुस्तक.