मन चंचल आहे ,ते कधीच स्वस्थ बसत नसतं. कधी आनंददायी, , कधी संतापाने तप्त , कधी संतोष दायक, कधी दुःखदायी अनेक प्रकारचे विचार मनांत येरझारा करीत असतात. मन आपल्यात , नातेवाईक , मित्र-मैत्रिणी ,समाज अनेक ठिकाणी गुंतलेले असते. असीमित चालीने ते त्रिभुवन फिरून येते.माझे मन कधी कधी मी कवितांमध्ये व्यक्त करते. डॉक्टर, शिक्षक, विद्यार्थी , मेघ, नभ , तरुवर ;नद्या, समाजात माजलेले अत्याचार, पौराणिक कथा, रीती रीवाज, थोर व्यक्तीत्व अनेक विषयावर मी ह्या पुस्तकांमधील कवितांमध्ये व्यक्त झाले आहे .माझे विचार व्यक्त केले आहेत.