• 29 March 2021

    नो साइड इफेक्ट थेरपी

    काहीतरी छानसं

    5 117

    नमस्कार

    गेल्या काही भागांमध्ये आपण नो साइड इफेक्ट थेरेपी बद्दल बोलतो आहोत. आज थोडीशी उजळणी करूयात. या उजळणी याचं कारण असं की, गेल्या काही दिवसात या सदराला वाचकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. या प्रतिसादाबद्दल आभार. आपण वाचक या थेरपीचा मनापासून अभ्यास करत आहात हे जाणवतंय. म्हणूनच वेगवेगळे प्रश्न सुद्धा आपल्यासमोर उद्भवलेले आहेत. आज आपण त्या प्रश्नांची उत्तरं पुन्हा एकदा समजून घेऊयात. यानिमित्ताने झालेल्या भागाची उजळणी होईल आणि अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतील. तर आजचा भाग झाला सा. वि. प्र.‌ असलेला. अहो असे गोंधळून जाऊ नका... इंग्रजी मधल्या "एफ ए क्यू" चा हा अनुवाद.. चला तर मग!

    १. टिशू सॉल्ट म्हणजे नक्की काय?

    आपल्या शरीराचे सगळ्यात लहान युनिट म्हणजे पेशी होय. या पेशी एकत्रितपणे काम करून आपल्या शरीराचा कार्यभार सांभाळत असतात. या पेशीमध्ये बायोप्लाज्मा नावाचा एक पदार्थ असतो. या बायोप्लाज्मा मध्ये अनेक खनिज व अकार्बनी पदार्थ असतात त्यांच्यावर पेशींचे आरोग्य निर्भर असते. शरीरातल्या पेशी मध्ये एखाद्या खनिज पदार्थांची कमतरता भासली तर फलस्वरूप शरीर रोगग्रस्त होते.. हे अकार्बनी खनिज पदार्थ म्हणजेच टिशू सॉल्ट होय.

    २. या थेरपी ला नो साईड इफेक्ट थेरपी का म्हणतात?

    एक तर टिशू सॉल्ट मध्ये कुठल्याही औषधांचा समावेश नाही, त्यामुळे ही संपूर्णपणे नैसर्गिक आहेत. दुसरे असे की ही खनिजं आपल्या शरीरात आधीपासूनच असतात, आपण फक्त त्यांची कमतरता भरून काढत असतो. ज्या गोष्टी आपल्या शरीरात आधीपासूनच उपस्थित आहेत व संपूर्णपणे नैसर्गिक आहेत, शिवाय औषध स्वरूप घेत असताना त्याचे प्रमाण देखील अतिशय कमी असते जेणेकरून त्यांचा कुठलाही साईड इफेक्ट होत नाही.

    ३. होमिओपॅथी आणि टिशू सॉल्ट थेरपी यामधील फरक काय?

    या दोन्ही चिकित्सापद्धती वेगवेगळ्या आहेत. टिशू सॉल्ट थेरेपी मध्ये कुठल्याही प्रकारचे औषध समाविष्ट नाही, तर होमिओपॅथीमध्ये औषधांचा समावेश आहे. होमिओपॅथी हे ऊर्जा पातळीवर काम करते तर टिशू सॉल्ट पेशींच्या पातळीवर काम करतात. असे असले तरीही टिशू सॉल्ट बनवण्याची पद्धत ही होमिओपॅथिक औषधे बनवण्याच्या पद्धती सारखीच असल्यामुळे बऱ्याच लोकांना ही होमिओपॅथिक औषधे वाटतात, मात्र मुळात होमिओपॅथी आणि टिशु सॉल्ट थेरपी या दोन वेगवेगळ्या चिकित्सापद्धती आहेत.

    ४. हे सॉल्ट आहेत तर रोजच्या जेवणात साध्या मिठा ऐवजी आपण यांचा वापर करू शकतो का?

    इथे मुळात सॉल्ट ही संकल्पना रसायनशास्त्राच्या अनुषंगाने समजून घेणे आवश्यक आहे.

    Salt, in chemistry, substance produced by the reaction of an acid with a base. A salt consists of the positive ion (cation) of a base and the negative ion (anion) of an acid. ...

    अशी सॉल्ट ची व्याख्या रसायनशास्त्रात केलेली आहे. आपले जेवणातले मीठ देखील याला अपवाद नाही. मात्र मघा मी सांगितल्याप्रमाणे होमिओपॅथिक पद्धतीने विशिष्ट प्रक्रिया करून हे सॉल्ट तयार केले जातात. ते वेगवेगळ्या खनिजांपासून तयार केलेले असतात. व त्यांचे प्रमाण सुद्धा अतिशय कवी असे असल्यामुळे ते जेवणात मीठाच्या ऐवजी वापरता येत नाहीत.‌

    ५. आम्हाला बीपी (ब्लडप्रेशर) चा त्रास आहे तर आम्ही हे घेतलेले चालतात का?

    हो. याचं कारण असं की, ब्लड प्रेशर चा संबंध आपण जे मीठ खातो त्याच्याशी आहे. आपण ते ज्या स्वरूपात आणि ज्या प्रमाणात खातो ते स्वरूप आणि ते प्रमाण ब्लड प्रेशर वर नकारात्मक पणे प्रभाव पाडते. औषध स्वरूप घेतले जाणारे हे सॉल्टस् चे प्रमाण आणि स्वरूप हे अतिशय कमी आणि वेगळे आहे. त्यामुळे यांचा नकारात्मक परिणाम ब्लडप्रेशर वर होत नाही. उलट ब्लड प्रेशर वर सॉल्ट अतिशय गुणकारी आहे.

    ६. आम्हाला दुसरे औषध सुरू आहे हे औषध घेतले तर नुकसान तर होणार नाही ना?

    निश्चितच नाही! कारण मुळातच हे सॉल्टस् संपूर्णपणे नैसर्गिक आहेत. यात कुठल्याही प्रकारचे औषध समाविष्ट नाही. त्यामुळे दुसऱ्या कुठल्याही थेरपी बरोबर तुही हे सॉल्टस् निश्चिंतपणे घेऊ शकता.

    ७. हे सॉल्ट किती दिवस घ्यावे लागतात?

    हे रोग्याच्या रोगावर आणि त्याच्या जुने पणा वर अवलंबून आहे. डोके दुखी, दात दुखी सारख्या तात्पुरत्या रोगांसाठी दोन दिवस सॉल्ट घेतले तरीही पुरेसे होते, मात्र रोग जुना असेल तर साधारण तीन महिने सॉल्ट घेणे फायदेशीर ठरते. सॉल्ट चा परिणाम दिसायाला सतरा दिवस तरी लागतात. मात्र काही वेळी अगदी जादूची कांडी फिरवल्यासारखा परिणाम सुद्धा बघण्यात आलेला आहे. असे असले तरीही चिकित्सकाने सांगितलेल्या दिवस सॉल्ट घेणे फायदेशीर ठरते

    ८. लहान मुलांना सॉल्ट दिलेले चालतात का?

    हो निश्‍चितपणे चालतात. मात्र त्यांचे प्रमाण चिकित्सकाने ठरवावे.

    ९. गर्भारीण बाईने सॉल्ट घेतलेले चालतात का?

    निश्चितपणे चालतात. खरेतर गर्भपात होऊ नये म्हणून, बाळाची वाढ चांगली व्हावी म्हणून, अरे डिलिव्हरी सुकर व्हावे म्हणून देखील गर्भवती स्त्रियांना आपण टिशू सॉल्ट प्रिस्क्राइब करतो.

    १०. मानसिक आजारांवर काही फायदा होतो का?

    मानसिक आजारांवर तर टिशू सॉल्ट थेरपी वरदान आहे असे मी म्हणेन.

    मित्रांनो मला प्रामुख्याने विचारण्यात आलेले 10 प्रश्न आजच्या भागामध्ये मी कव्हर केले आहेत. अजूनही काही प्रश्न असतील तर निसंकोचपणे विचारावे अशी विनंती.

    टिशू सोल्ट चा वापर करून नैसर्गिक रित्या स्वस्थ राहता येते हे पुन्हा एकदा आवर्जून सांगेन!

    डॉ. सुरुचि अग्निहोत्री नाईक



    Suruchi Naik


Your Rating
blank-star-rating
Seema Puranik - (29 March 2021) 5
अतिशय उपयुक्त आणि महत्वाची माहिती ,सर्व संशय नाहीसे झालेत

0 0

Veena Kantute - (29 March 2021) 5

0 0

Jaya Rode - (29 March 2021) 5
कुठे उपलब्ध होइल अणि वापरायचे काय प्रमाण?

0 0

Kavita. Dindulkar - (29 March 2021) 5

0 0