• 01 March 2021

    नो साईड इफेक्ट थेरेपी

    प्रिवेंशन थेरेपी

    5 402

    मागच्या भागांमध्ये आपण 12 नैसर्गिक क्षारांची ओळख करून घेतली होती. पुढे आपण यातील प्रत्येक क्षाराबद्दल माहिती घेणार आहोत मात्र त्याआधी या औषध पद्धतीचे किंवा या चिकित्सा पद्धतीचे फायदे आणि उपयोग जाणून घ्यायला हवेत नाही का? तर ही बाराक्षार चिकित्सा पद्धती का उपयोगात आणली पाहिजे? त्याची काही सरळ आणि सोपी कारणे आहेत ती आपण आता बघूयात.

    त्यातलं सगळ्यात पहिलं कारण आपण या लेखमालिकेच्या अगदी पहिल्या भागापासून बघतो आहे ते म्हणजे नो साइड इफेक्ट. या चिकित्सेचा कुठलाही दुष्परिणाम होत नाही.

    दुसरं असं की हे बाराक्षार नैसर्गिक असल्यामुळे बाराक्षार चिकित्सा ही कितीही काळापर्यंत चालू ठेवता येते.

    ऍलोपॅथिक मेडिसिन मध्ये आपण बघतो की काही औषध केवळ काही काळाकरता घेता येतात, त्यानंतर ती घेऊ नये असं सांगण्यात येतं. बाराक्षार चिकित्सा पद्धतीचं असं नाही. काही आजार, जे विशेषतः मेटाबोलिक असतात म्हणजेच आपल्या शरीराच्या मेटाबोलिजम वर किंवा मेटाबोलिजम बिघडल्यामुळे झालेले असतात, अशा आजारांना बाकी ट्रीटमेंट पेक्षा जास्त वेळ लागू शकतो. अशावेळी बाराक्षार चिकित्सा पद्धती अत्यंत उपयोगाला पडते कारण एक दिवसापासून तर वर्ष वर्ष पर्यंत देखील हे क्षार घेतल्या जाऊ शकतात; त्यांचा काहीही दुष्परिणाम होत नाही; अर्थात या क्षेत्रातील जाणकारांच्या सल्ल्यनेच हे करता येते. एखादा आजार दूर होण्यासाठी त्या व्यक्तीचा व्यक्तिगत अभ्यास करून चिकित्सा करणं गरजेच असतं. या अभ्यासावर कुठल्या व्यक्तीला किती काळासाठी ही चिकित्सा द्यावी लागेल याचा अंदाज बांधता येतो. विशेष सांगण्याचा मुद्दा हा की ही चिकित्सापद्धती कितीही काळासाठी असली तरीही दुष्परिणाम रहित आहे. काही केसेस मध्ये तर अगदी आयुष्यभरासाठी सुद्धा या चिकित्सा पद्धतीचा उपयोग केल्या जातो. अशा केसेस मध्ये विशेष करून जन्मत: झालेले आजार, डाऊन सिंड्रोम, सेरिब्रल पल्सी, ऑटिझम अशा अवस्थांचा समावेश आहे.


    बाराक्षार चिकित्सा पद्धती ही औषध पद्धती नाही हे आपण पाहिलं आहे. आणि म्हणूनच बाराक्षार चिकित्सा पद्धती ला आपण *प्रिव्हेन्शन थेरपी* असं देखील म्हणतो. खरं तर आपलं शरीर आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने संकेत देत असतं. अगदी साधं उदाहरण घेऊ. घसा कोरडा पडला म्हणजे आपल्याला तहान लागली आहे असं आपण समजतो. म्हणजेच आपल्या शरीरात पाण्याची कमतरता होत आहे असा संकेत आपलं शरीर आपल्याला तहाने द्वारे देत असतं. याच प्रमाणे आपल्या शरीरात जर एखाद्या मीनरल सॉल्ट ची म्हणजेच या बारा क्षारांपैकी एखाद्या क्षाराची कमतरता शरीराला भासली तर शरीर संकेत देत असतं. मात्र ते संकेत आपल्याला अभ्यासानेच समजू शकतात.

    एक छोटं उदाहरण सांगते. आपल्यापैकी अनेकांनी अनेक वेळा या सिच्युएशन चा सामना केला असेल. अचानक सतत तीन-चार दिवस थोड्या थोड्या वेळाने हाता पायामध्ये गोळे येणे हा अनुभव आपल्यापैकी अनेकांनी घेतला असेल. हा खरं तर एक संकेत आहे. आपल्या शरीरात ज्या वेळी पाणी आणि मॅग्नेशियम फॉस्फेट या क्षाराची कमतरता असते त्यावेळी हाता पायामध्ये असे गोळे यायला सुरवात होते. या संकेतांकडे आपण दुर्लक्ष केलं तर हे गोळे येण्याचं प्रमाण वाढत जाऊन त्याचा त्रास होऊ शकतो. मात्र हा संकेत आपल्याला माहिती झाल्यास आपण लगेचच उपचार केल्यामुळे पुढे होणारा त्रास आपण आधीच थांबवू शकतो. फक्त त्रास झाल्यावरच बाराक्षार चिकित्सा पद्धती चा उपयोग न होता प्रिवेंशन थेरपी म्हणून सुद्धा या बारा क्षारांचा उपयोग होतो ही एक आनंदाची बाब नाही का?

    आपण बारा क्षार चिकित्सा पद्धतीला प्रेवेंशन थेरपी असं म्हटलं. याबद्दल आता अजून थोडं सांगू इच्छिते. अनेकदा आपण जेनेटिक डिसीजेस किंवा बद्दल बोलतो. अनुवांशिकतेने आलेले आजार हे पुढच्या येणाऱ्या पिढीत येतात. या अनुवांशिक रोगांच्या बाबतीत मी बारा क्षार चिकित्सा पद्धती ला एक वरदान असं सुद्धा म्हणेन कारण हे अनुवांशिक रोग आपल्या पर्यंत येऊ नये म्हणून या बाराक्षार पद्धतीचा उपयोग करता येतो. सेल लेव्हल म्हणजे पेशींपर्यंत किंवा जेनेटिक लेव्हल म्हणजे जीन्स पर्यंत जाऊन सुद्धा हे क्षार अनुवांशिकतेने येणाऱ्या आजारांवर नियंत्रण करू शकतात. डायबिटीस, थायरॉईड, अल्झायमर, पार्किन्सन, उच्च रक्तदाब, ऑस्टियोपोरोसिस, हृदय विकार, पाचन शक्ति व लिव्हरचे होणारे आजार असे अनेक आजारांनी शरीर ग्रासण्याच्या आधीच बाराक्षार चिकित्सा पद्धतीने या आजारांवर नियंत्रण करता येते. हे आजार होऊच नये म्हणून बाराक्षार चिकित्सा पद्धतीचा वापर यश्स्वी पणे केल्या जातो.

    आता बाराक्षार चिकित्सा पद्धती का वापरावी किंबहुना बिनधास्तपणे का वापरावी याचं अजून एक कारण मी तुम्हाला सांगते. बरेचदा अमुक औषधा बरोबर दुसरी औषध घेऊ नका असं आपण सांगितलेलं ऐकत असतो. मात्र या बारा क्षारांना तसं कुठलंच बंधन नाही. हे बारा क्षार कुठल्याही इतर चिकित्सा पद्धती बरोबर देखील घेता येतात. खरंतर इतर कुठल्या चिकित्सापद्धती ची आवश्यकता आहे किंवा नाही हे तज्ञ व्यक्तीकडूनच समजू शकते मात्र अनेकदा आजाराने ग्रस्त असलेले व्यक्ती कुठल्याही एका चिकित्सा पद्धतीवर संपूर्णपणे विश्वास ठेवू शकत नाही, अर्थात हा त्यांच्या मानसिक ताणाचा भाग झाला, पण समाधान म्हणून का होईना एक अथवा दोन चिकित्सा पद्धतीचा वापर ते करतात अशावेळी बाराक्षार चिकित्सा पद्धती ही अत्यंत सेफ आणि दुष्परिणाम रहित आहे. या क्षाराची दुसऱ्या कुठल्याही औषधांबरोबर रिएक्शन होत नाही.


    ही पद्धती का वापरण्यात यावी याचे अजून एक कारण म्हणजे इतर चिकित्सापद्धती उपलब्ध नसताना देखील फर्स्ट एड म्हणून आपण या चिकित्सा पद्धतीचा वापर यशस्वीपणे करू शकतो.फ़क्त बारा प्रकारचे क्षार आपल्या कायम आपल्यासोबत बाळगावे लागतील एवढच!

    बाराक्षार चिकित्सा पद्धती हे मानसिक आजारांवर ज्याला आपण सायकोसोमॆटिक डिसीजेस म्हणतो त्यावर अतिशय फायदेशीर आणि अतिशय चमत्कारिक पणे इलाज देणारी आहे. यात भिती वाटणे, काळजी वाटणे, डिप्रेशन येणे, असे अनेक प्रकार आहेत. अगदी एखाद्या गोष्टीची भीती वाटून पॅनिक होण्याची सिच्युएशन सुद्धा या चिकित्से द्वारे ताबडतोब हाताळता येऊ शकते. बरेचदा एखादी गोष्ट बघून किंवा ऐकून धक्का बसतो, मानसिक दडपण येतं, अशावेळी बाराक्षार चिकित्सा पद्धतीचे इन्स्टंट परिणाम अत्यंत फ़ायदेशीर ठरतात.


    लाईफ स्टाईल डिसीजेस, म्हणजेच आपल्या रोजच्या जीवन जगण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे निर्माण झालेल्या आजारांवर तर बाराक्षार चिकित्सा पद्धती अत्यंत उपयुक्त आहे. नुकतंच आपण कोवीड-19 चा सामना केलेला आहे. अशामध्ये ईम्युनिटी बूस्टिंग म्हणजेच रोगप्रतिकारशक्ती ची वाढ करणे आपल्याला किती आवश्यक आहे हे आपल्याला महितच आहे. बाराक्षार चिकित्सेच्या नियमित उपयोगामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढविण्‍यात उपयोग होतो. अर्थात त्यासाठी दिले जाणारे क्षार हे प्रत्येकाच्या शरीराच्या गरजेनुसार दिले जातात आणी त्यासाठी तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.


    हॉर्मोनल इमबॅलन्स हा प्रकार आज काल 90 टक्के स्त्रियांमध्ये बघावयास मिळतो. लाईफस्टाईल, स्ट्रेस, टेन्शन, योग्य आहाराची कमतरता, योग्य व्यायामाची कमतरता अशा अनेक कारणांमुळे शरीरातले हार्मोन्स डिस्टर्ब होतात. हार्मोनल डिस्टर्बन्स या विषयावर आपण एका स्वतंत्र लेखात बघणार आहोतच, मात्र हे हॉर्मोन्स शरीरात मुबलक प्रमाणात आणि योग्य पद्धतीने तयार होण्यासाठी बारा क्षारांपैकी जवळजवळ सर्व क्षार वेगवेगळ्या प्रकारे उपयोगात येत असतात. म्हणूनच हॉर्मोनल इम्बॅलन्स चे एक उपयुक्त निराकारण म्हणजे हे नैसर्गिक क्षार आहेत.

    ज्याप्रमाणे स्त्रियांमध्ये हॉर्मोनल इमबॅलन्स चे वाढते प्रमाण दिसते आहे त्याचप्रमाणे स्त्री व पुरुष दोघांमध्ये देखील प्रजोत्पादन क्षमता कमी होत असल्याचे आज-काल बघावयास मिळते. त्यासाठीसुद्धा हे नैसर्गिक क्षार अत्यंत उपयोगी ठरतात.


    *थोडक्यात सांगायचं झालं तर मी पुन्हा एकदा आहेच आणि आवर्जून सांगेन की आपल्या शरीराचे कार्य हे आपल्या शरीरातील पेशींवर अवलंबून असते. आपल्या शरीरात असंख्य पेशी आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारच्या असून वेगवेगळ्या कार्यांमध्ये कार्यरत असतात. असे असले तरीही त्या पेशींमध्ये असलेले घटक हे बऱ्याच प्रमाणात सारखे असतात. किंबहुना काही घटकांशिवाय पेशी तयारच होऊ शकत नाही त्या अत्यावश्यक घटकांमध्ये या बारा क्षारांचा समावेश होतो. त्यामुळे सेल लेव्हलवर काम करून हे क्षार रोगांना समूळ नष्ट करण्यात उपयोगी पडतात.*


    आजच्या या भागांमध्ये बाराक्षार पद्धती कशी उपयोगी आहे तसेच रोगांचा समूळ नाश या पद्धतीमुळे कसा होतो हे आपण पाहिलं. आता आपण हळूहळू डीप स्टडी कडे वळणार आहोत. माझी वाचकांना नम्र विनंती आहे की या संदर्भात त्यांना कुठलेही प्रश्न पडले असल्यास कृपया कमेंट मध्ये आपले प्रश्न लिहून पाठवावे किंवा या मेल आय़डी वर संपर्क करावा.


    डॉ. सुरूची अग्निहोत्री नाईक

    पीएचडी ह्यूमन न्यूट्रिशन

    drsuruchi.tissuesalt.clinic@gmail.com

    (लेखिका अनेक वर्षांपसून टिशू सॉल्ट थेरपिस्ट म्हणून कार्यरत आहेत)




    Suruchi Naik


Your Rating
blank-star-rating
Seema Puranik - (06 March 2021) 5
ह्या बद्दल अजून जाणून घेण्याची उत्सुकता वाढली आहे। सद्यस्थितीत सुरक्षित चिकित्सा पद्धतीची गरज आहेच 👌🙏

0 0

varsha walvekar - (01 March 2021) 5

0 0

ऋचा दीपक कर्पे - (01 March 2021) 5
खूप छान माहिती...

0 0