• 04 May 2021

    मंगळवारची टवाळखोरी

    हसण्यासाठी जन्म आपुला

    5 185

    हसण्यासाठी जन्म आपुला

    मंडळी, दोनच दिवसापूर्वी ( २ मे )जागतिक हास्य दिन का काय साजरा झाला म्हणे. त्यावरच आजचा हा स्तंभ लेख

    सर्वप्रथम सोशल मिडियावरील सगळ्या इमोजींचे अनेक आभार की आम्ही हसलोय, हसतोय, हे आँन लाईन सांगण्यासाठी आम्हाला हे खूप मदत करतात.

    सध्या एखादी प्रासंगिक घटना घडली, किंवा त्याची चाहूल जरी लागली तरी त्याचे मिम्स बनवून , सोशल मिडीयावर तात्काळ पाठवणा-या आणि त्याचा तात्काळ प्रसार करणाऱ्या सर्व ढकलजीवींचे ही यानिमित्याने आभार

    फक्त अडचण अशी की मी एका अमूक पक्षाचा तर मी फक्त तमुक पक्षांवरच हसणार अस कितीही केलंत तरी एखादा विनोद वाचल्यावर खुदकन मनात हसू येत असेल तर तुम्ही अजूनही 'काॅमन मॅन ' आहात

    लाजून हासणे अन हासुन हे पहाणे

    मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे

    सोशल मिडीया हा आत्ताचा हो. आम्ही शाळेत असताना आम्हीच सोशल. मित्र- मंडळीभेटल्यावर 'माझी टवाळखोरी '( ही माझ्या पुस्तकाची जहिरात आहे, जाता जाता करु म्हणलं ) जरा जास्तच रंगायची. अर्थात प्रत्येकाने हे सोनेरी दिवस अनुभवले असणार. आजही अगदी रोज नाही पण अधून मधून मित्र मंडळ भेटले , हास्य- गप्पा झाल्या की जी उर्जा मिळते त्याला तोड नाही.

    मध्यंतरी काही टीव्ही वरील लाफ्टर शो ने मजा आणलेली. जसे अगदी पहिल्यांदा शेखर सुमनचा ' मुव्हर्स अँन्ड शेखर', नंतर रंगलेली ' लाफ्टर चँलेंज स्पर्धा ' मग मराठी वाहिनीवरच्या हवा येऊ द्या सारख्या मालिकांनी मजा आणली.

    मात्र लक्ष्या- अशोक मामा - विजय चव्हाण या मंडळींनी सिनेमा/ नाटकातून आमच्या पिढीला अगदी मनमुराद हसवले.

    अगदी आमचा "मोग्यांबो खूष" व्हायचा हे शिनेमे पाहून

    (पाचकळ/ पांचटपणा वगैरे वाटणारे बहुतेक.. राहू दे.. त्यांच ज्ञान त्यांच्यापाशी)

    मात्र आमच्या तरुणपणीचे राजकारणी मात्र आजच्या राजकारण्यांपेक्षा जरा कमीच पडले हास्य विनोदी स्टेटमेंट मारण्यात

    दिसलीस तू, फुलले ऋतू

    उजळीत आशा, हसलीस तू

    या भानगडीत काही आम्ही पडलो नाही आणि बळेबळे असं काही म्हणावे लागलं नाही

    आठवणीतील अनेक गाण्यात ही हास्य डोकावलेले आढळते. काही उदाहरणे

    मूक जिथे स्वरगीत होतसे

    हास्य मधुर तव तिथे स्फुरतसे

    जीवन नाचत गात येतसे

    स्मित - चाळ त्यास बांधून पहा

    सखी शेजारणी तू हसत रहा

    ( टिप: वरील गाणे आपापल्या जबाबदारी वर गाणे )

    एका गोष्टीत सगळेजण माझ्याशी सहमत होतील ते म्हणजे लहान मुलांचे निरागस हास्य

    असेच एक मुलांसाठी चे गाणे:-

    प्रकाशातले तारे तुम्ही, अंधारावर रुसा

    हसा मुलांनो हसा

    तुम्हा बोलवी ती फुलराणी

    खेळ खेळती वारा पाणी

    आनंदाच्या शिखरावरती खुशाल जाऊन बसा

    रडणे हा ना धर्म आपुला

    हसण्यासाठी जन्म घेतला

    भारतभूच्या आदर्शाचा मनी उमटू दे ठसा

    तेंव्हा मंडळी तुम्ही ही लक्षात ठेवा

    हसते हसते कट जाते रस्ते, जिंदगी यूँ ही चलती रहे

    खुशी मिले या गम, बदलेंगे ना हम

    दुनिया चाहे बदलती रहे

    हसताय ना ? हसायलाच पाहिजे

    ( खास आमच्या मित्रांसाठी

    भरपूर वेळ बसा, भरपूर हसा

    भले होऊ दे, मोकळा खिसा )

    अमोल केळकर



    अमोल केळकर


Your Rating
blank-star-rating
akshata देशपांडे - (22 May 2021) 5
खूप छान.. हसणे हा जन्मासिद्ध हक्कच की 😊

1 0

उज्वला कर्पे - (09 May 2021) 4
हसण्यासाठी जन्म आपुला, मस्त

0 0

ऋचा दीपक कर्पे - (05 May 2021) 5
हसा चकटफू😆😆

0 0

Seema Puranik - (04 May 2021) 5
😄😄👏👏

1 0

Sonali Mulkalwar - (04 May 2021) 5

1 0