• 20 April 2022

    भावविश्व

    अवचित

    5 111

    अवचित हे शब्द मी सर्वात आधी मी फार लहान असताना कदाचित मी वय वर्ष ७-८ असताना ऐकले. लहानपणी मी सारखी आजारी असायचे माझ्या आईला कोणी सांगितले अवचित सवाष्ण म्हणून दर पाच बुधवारी कोणाकडे जेवायला जा नंतर वर्षभर बुधवार चा उपवास करा. माझ्या आईने सगळे केले होते, आश्चर्य म्हणजे त्यानंतर माझी तब्येत अगदी ठणठणीत  रहात असे. आपले जीवन खरेतर आईवडिलांचीच देणगी असते. त्यांनी जे कष्ट आपल्याकरता केलेले असत त्याला काहीच जोड नाही...असो.

     नंतर अवचितपणे होणाऱ्या गोष्टीने नेहमीच मी आश्चर्यचकित होत असे. अवचितपणे येणारे सुख खूप मोट्ठा आनंद तर येणारे दु:ख मन सैरभैर करून जायचे. हळूहळू कळले की आयुष्यात येणारे प्रत्येक क्षणं अनपेक्षितपणेच येतात आणि प्रत्येक वेळेस त्या क्षणाला आपली प्रतिक्रिया पण एकाएकी दिली जात असे. प्रत्येक प्रतिक्रिया आपल्यातील लपलेल्या एका नव्या मी ला परिभाषित करत असे. प्रत्येक वेळी जणू मी कोणी नवीनच मी आहे....असो.

          अवचित पणेच का असोना नव्या-नव्या अनुभवाने समृद्ध झालेल्या ह्या आयुष्यात जगण्याची मज्जाच वेगळी आहे.

        कोविड चे आगमन, नंतर घरात राहण्याचे बंधन, प्राकृतिक आपदा किंवा प्रकृतिक वरदान, घरातील बारीक सारिक गोष्टी..कितीतरी आपल्या ध्यानी मनी न असणाऱ्या घटनांना आपल्याला सामोरं जावं लागतं.

            आता हे आपणच ठरवायचे अवचितपणे उभ्या राहणाऱ्या ह्या क्षणांना आपण आपल्यात लपलेल्या एका नव्या मी सोबत किती ताकदीने भिडतो!...ते काही-ही असुदे पण  ह्याने तुमचे अनुभव विश्व नक्कीच समृद्ध होणार...

     सौ. मीनल आनंद विद्वांस

    -->

    मीनल विद्वांस

Your Rating
blank-star-rating
Lata Vidwans - (24 April 2022) 5

0 0

हेमंत कदम - (22 April 2022) 5

1 1

स्नेहमंजरी भागवत - (21 April 2022) 5
वा छान

1 1

ऋचा दीपक कर्पे - (20 April 2022) 5
अवचित एक नवीन विचार सापडला

1 1

Sarita Kothari - (20 April 2022) 5

1 2