• 07 May 2022

    एक कप चहा

    चहा

    0 60

    सहज चहा पिता पिता पूर्वीचा लेख आठवला म्हणून हा लेखनाचा घाट घातला!
    वय कितीही वाढू दे हो चहा तर प्रत्येक वयात लागतोच.आमच्याकडे म्हणतात की ,चहा पीत नाही तो माणूस नव्हेच! बाहेर कितीही कडक उन असलं ना तरी आग्रह करकरून चहा दिला जातो.पावसाळ्यात तर छोट्याश्या आणि गोंडस टपरी वरचा पाच रुपयाच्या चहा बसतात थोडेसे चटके पण तेवढंच मनाला समाधान म्हणजे सोने पे सुहागा ! बरं का ! चहाशिवाय आमची सकाळ होत नाही आणि काहीना रात्री पण चहा लागतो .
    आयुष्यभर घालवलेले क्षण एकमेकांसोबत आणि त्यात चहा असेल तर आहाहा! त्याकित्येक जणांना चहा आवडतो आणि कितीतरी लोकांच्या लव्ह स्टोरी कॉफीवरून चालू होत असतील तरीसुद्धा चहा आम्हाला असा विशेष प्रिय असतो .कलियुगातील अमृत म्हणतो तर त्यात चुकीचं असं काही ठरणार नाही . जस्ट इमॅजिन समोर भरभरून पाऊस पडतो आहे आणि अचानक कुणीतरी आयता चहाचा
    कप तुमच्यासमोर आणून ठेवला तर ...वावावा !



    दीप्ती घळसासी


Your Rating
blank-star-rating
Sorry ! No Reviews found!