• 23 November 2022

    जिथे जाऊ तिथे खाऊ

    सूप

    5 122

    थंडी , हिवाळा म्हणजे भाज्यांची , गरम -गरम पदार्थांची रेलचेल, रसनाचे चोचले , मज्जाच मज्जा ! शरीराला उष्णता देण्यासाठी हिरव्या पालेभाज्या, आल्याचा चहा , कॉफी, केळी, ड्रायफ्रूट, आहारात समावेश करू शकतो. आज " जेथे जाऊ तेरे खाऊच्या " या सदरात आपण काही सोपे प्रकाराचे सूप बनवूया.हिवाळ्यात शरीराला उष्णता देण्यासाठी सूप हा सर्वोत्तम पर्याय आहे. आपण सूपचे अनेक प्रकार व अनेक प्रकाराच्या भाज्या घालून चविष्ट सूप बनवू शकतो. सूप आपल्या शरीरातील हाडं मजबूत करतं आणि थंडीमुळे होणार्‍या समस्यांपासून आपला बचाव करतं.
    गेल्या काही दिवसांपासून हवेत गारवा आला आहे. हिवाळ्यात गरम सूप प्यायल्याने आपल्याला उबदार तर जाणवेलच, शिवाय रोगप्रतिकारशक्तीही वाढेल आणि आपण निरोगी राहूया.
    साधारणपणे जेव्हा आजारी नसतात तेव्हा जास्त सूप पितात, परंतु सूपला आपल्या दिनचर्येचा अनिवार्य भाग बनवण्याचे अनेक फायदे आहेत. आपण सूप का प्यायला हवे, हे आपण अभ्यासले पाहिजे. केवळ जेवणापूर्वी सूप पिणे हे एक सोपस्कार नसावे, त्यामागची कारणे कळली तर आपण नक्कीच आपण रोज सूप प्यायला सुरुवात करू.
    आपल्या तोंडातील चव बदलावी असे वाटत असेल तर सूप प्यावे . हे आपल्या तोंडाची चव बदलेल येवढेच नव्हेतर शारीरिक दुर्बलतेमध्ये सूप सेवन केल्याने आपल्याला ऊर्जा मिळते आणि पूर्वीपेक्षा अधिक निरोगी , चैतन्यता वाटते. हळूहळू आपली ऊर्जा पातळी देखील वाढू लागते आणि आपला उत्साह द्विगुणित होतो .चला तर मग आज बनवूया शरीरात उष्णता वाढवणारे सूप .
    थंड़ीचे विशिष्ट आणि सरळ पौष्टिक घरगुती सूप -

    मुगाच्या डाळीचे कढ़ण-
    ******************
    पाव कप मुगाची डाळ स्वच्छ धुवून घ्या, आणि मऊ शिजवून घ्या. आता त्याला नीट घोटून घ्या. आता यास तुपाची फोडणी द्या. तुपात जिरे, कढ़ी पत्ता, हिरवी मिरची, हिंग घालून उत्तम फोडणी करा. यात चवीनुसार मीठ, वरुन बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ओला नारळ घालून, पातळ करुन छान उकळून घ्या.

    टोमेटो सार -

    ********


    एक किलोच्या जवळ लाल टोमेटो, एक ओला नारळ आणि जिरे मिक्सर मधून काढून घ्यावे आणि गाळणीतून गाळून घ्यावे. यात तूप, जिरे, मिरे, दालचिनी, हिंग, बेडगी मिरचीचे तिखट घालून टोमेटोचे पल्प घालायचे. यात आवडीनुसार पातळपणा ठरवून पाणी घाला. हवे असल्यास गूळ घालावा म्हणजे उत्तम आंबट गोड चव येते. चवीनुसार मीठ घालून नीट उकळून घ्यावे. वरुन हिरवी चिरलेली कोथिंबीर आणि क्रीम किंवा कोकोनट मिल्क घ्यावे.

    शेवग्याच्या शेंगांचे सार -
    *****************


    तीन ते चार भरपूर गर असलेल्या शेंगा घ्या. साल न काढता, लहान तुकडे करुन दोन ते तीन शिट्टी घेऊन कुकरमध्ये किंवा पातेल्यात पाणी घालून शिजवून घ्या. आता मिक्सरमध्ये दोन तीन लसूण कळी, अर्धा ओल्या नारळाचा गर, आलं, जिरे घालून वाटून घ्या. आता उकडलेल्या शेंगाचे पाणी वेगळे काढ़ा आणि शेंगांचे गर आणि बिया काढ़ून घ्या आणि मिक्सर मधून काढून घ्या. आता तूप, जिरे, हिरवी मिर्ची, कढ़ी पत्ता, हिंग घालून फोडणी तयार करा आणि त्यात नारळ लसणाचे वाटण घालून दोन मिनिटे शिजवून घ्या. थोडे मिरे, हळद घालून चवीपुरते मीठ घाला आणि नंतर शेंगांचा गर आणि उकळलेले पाणी घालून आपल्या आवडीप्रमाणे पातळपणा ठरवा. चवीपुरता गुळाचा खडा आणि आवडत असल्यास एखादे आमसूल घालता येतं.



    vasudha gadgil


Your Rating
blank-star-rating
nita shende - (29 November 2022) 5
सर्व सूप रेसिपी अतिशय पौष्टिक आहार आहे.

0 0

Manjiri Ansingkar - (24 November 2022) 5
खूप छान सूपचे प्रकार! योग्य वेळी योग्य पोस्ट

0 0

Bhakti Kale - (24 November 2022) 5
शेवग्याच्या शेंगांचे सूप... अहा !

0 0

अंतरा करवड़े - (24 November 2022) 5
एकदम बरोबर वेळ साधून सूप पिण्याकडे वळवल्याबद्दल आभार. उत्तम रेसिपीज, पौष्टिक आणि चविष्ट सूप.... वाह!

0 0

ऋचा दीपक कर्पे - (23 November 2022) 5
वाह जी वाह..... सर्दी में गर्मी का अहसास!

1 0