• 06 October 2022

    जिथे जाऊ तिथे खाऊ

    दसरा विशेष

    0 84

    जेथे जाऊ तेथे खाऊ दसरा विशेष

    ***************************

    सादर नमस्कार आणि आपण सर्वांना दसऱ्याचा हार्दिक शुभेच्छा !

    अश्विन शुद्ध दशमी म्हणजे विजयादशमी , दसरा हा भारतीय धार्मिक , सामाजिक संस्कृतीचा महत्त्वाचा दिवस आहे. नवरात्राच्या पहिल्या दिवसापासून देवीची घटस्थापना केल्यावर दहाव्या दिवसापर्यंत नवरात्र साजरे केले जाते. दसरा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक महत्त्वाचा मुहूर्त आहे या दिवशी नवीन वाहने , नवीन वस्तू , कपडे, सोन्याचे खरेदी केली जाते. सरस्वती देवीचे पूजन दसऱ्याच्या दिवशी विशेष रूपाने केले जाते , या दिवशी देवी दुर्गा ने महिषासुर या राक्षसावर विजयी मिळवून हिंदू धर्माचे रक्षण केले होते.

    दसऱ्याच्या दिवशी गावाचे सीमा ओलांडून जाण्याची प्रथा आहे , या दिवशीच शमीपत्र किंवा आपट्याची पानं आधी देवाला व नंतर वडील मंडळींना देऊन आशीर्वाद घेतात.

    दसरा हा सण , वाईट व नकारात्मक प्रवृत्तींवर चांगल्या आणि सकारात्मक प्रवृत्तींचे विजयाचे प्रतीक असा सण मानला गेला आहे . या दिवशी संपूर्ण भारतात रावण च्या पुतळ्याचे दहन केले जाते त्या मागचे कारण असे की रावण हा दंभी , अहंकारी होता त्याच्या अहंकारानेच लंका दहन कारणीभूत झाले. असा अहंकार माणसांमध्ये कधी ही आला नाही पाहिजे म्हणून रावणाचे दहन करून वाईट प्रवृत्तींवर चांगल्या प्रवृत्तींचा विजय होतो , हे प्रतीकात्मक रित्या दर्शविले जाते .भारतात दसरा अनेक राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. दक्षिण पूर्वेकडे , उत्तर भारतात विजयादशमीला दुर्गा पुजा ची सांगता होते .उत्तर प्रदेश , मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये हा सण दसरा , रामलीला आणि रामाने रावणावर केलेल्या विजया चे स्मरण या रूपात साजरा केला जातो. काही ठिकाणी दहा दिवस दुर्गाची प्रतिमा स्थापना करून, पूजा अर्चना करून, दहाव्या दिवशी सागरात किंवा नदीमध्ये विसर्जन केले जाते.

    भक्ती आणि शक्ती ऊर्जा संचयाचा सण म्हणजे दसरा. दसऱ्याला वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळे पदार्थ बनवण्याची पद्धत आहे . महाराष्ट्रात बासुंदी , पुरी , बटाट्याची भाजी , चटणी , कोशिंबिर , वरण-भात याचा नैवेद्य दाखवला जातो. तसेच बासुंदीच्या ऐवजी श्रीखंड पुरीचा नैवेद्य पण असतो. आज आपण बासुंदी पुरी , श्रीखंड पुरी बटाट्याची भाजी ची कृती बघूया.

    बासुंदी-

    एक लिटर दूध, साधारण थोडं आटवायचं थोडं घट्टसर झालं की त्यात पाव वाटी साखर , थोडीशी भाजलेली चारोळी , वेलची पावडर केशर ,घालायचे.

    श्रीखंड-

    एक लिटर दुधाला गरम करून थंड करायचं आणि त्याला विरजण लावून त्याचे दही बनवायचे. साधारण साडेतीन ते चार तासात उत्तम दही तयार होते. त्याला मऊ कापडात घट्ट बांधून सहा ते सात तास ठेवायचे , त्यातला पाण्याचा अंश पूर्णपणे निघून गेला की साधारण 200 ग्रॅम चक्का तयार होतो .200 ग्रॅम चक्काला 175 ग्रॅम साखर घालायची आणि ती घोटून चार तास ते मिश्रण तसेच ठेवायचे. साखर आणि चक्का एक जीव झाल्यावर त्याला श्रीखंडाच्या यंत्राने घोटून काढायचे व त्यात केशर वेलची पावडर घालायचे .

    पुरी-

    200 ग्रॅम गव्हाची कणिक घ्यायची त्यात एक छोटा चमचा तेल घालायचे आणि घट्ट भिजवायचे. साधारण अर्ध्या तासाने लहान सर लाट्या बनवून त्या लाटून तेलात किंवा साजूक तुपात तळायच्या.

    बटाट्याची भाजी-

    एक पाव बटाटे कुकरमध्ये उकडून द्यायचे. त्याची सालं काढायची एका बटाट्याचे आठ काप होतील असे चिरायचे आणि तेलात हिंग , मोहरी , कढीपत्ता, हिरवी मिरचीची छोटे तुकडे , हळद घालून बटाट्याचे काप घालायचे. त्यावर धणे पूड , गरम मसाला घालून व्यवस्थित उलथण्याने भाजी एकसारखी हलवून घ्यायची , चवीपुरते मीठ घालायचे आणि आवडत असल्यास साखरेची चव घालायची. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी कोथिंबीरीने भाजीची चव वाढते. चटणी , कोशिंबीर , वरण भाताची कृति मागच्या ब्लॉगमध्ये दिली आहे कृपया ती कृति बघावी. - डॉ. वसुधा गाडगीळ , इंदूर.



    vasudha gadgil


Your Rating
blank-star-rating
Sorry ! No Reviews found!