• 13 October 2022

    जिथे जाऊ तिथे खाऊ

    आज दक्षिणेकडे जाऊ.....

    5 97

    सणासुदीचे दिवस म्हणजे गोडाधोडाचे पदार्थ खाण्याची मज्जा असते. दसरा आणि दिवाळी या सणांच्या मधल्या दिवसांमध्ये कुटुंबाच्या प्रत्येक माणसाला खूप काम असतात . घराची पोताई, स्वच्छता , आटाळा काढणे शिवाय घरातल्या गृहिणीला फराळाची तयारी करणे. अख्ख घर कामात असतं या कामा च्या लगबगीत काही वेगळे चविष्ट पदार्थ खायला मिळाले की घरातला प्रत्येक माणूस दुप्पट ऊर्जेने ताकदीने भरभर काम करतो. या दुप्पट ताकदीसाठी आज आपण जेथे जाऊ तेथे खाऊ या स्वयंपाकघरात चव बदलण्यासाठी मुरकु आणि पायसम असे दोन चविष्ट पदार्थ बनवूया.

    मुरकु हा भारताच्या दक्षिणे भागातला चकलीचा एक प्रकार आहे महाराष्ट्रात जसं दिवाळीच्या फराळामध्ये चकली बनवली जाते तसेच दक्षिण भारतात मुरकु बनवतात मूर्ख आहे तांदूळ आणि उडदाच्या डाळी चा प्रयोग करून बनवतात यामध्ये नारळाचे दूध घातले जाते दक्षिण प्रांतात मुरकु खोबरेल तेलात तळतात. नारळाच्या दुधाचा वापर आणि खोबरेल तेलातलं तळण त्यामुळे मुरकुचा स्वाद वेगळाच लागतो.

    मुरकु बनवण्यासाठी साहित्य

    चार वाटी तांदूळ एक वाटी उडदाची डाळ , एक चमचा जिरे, तळणसाठी शेंगदाण्याचं किंवा आवडत असल्यास खोबरेल तेल. चवीनुसार हिंग , चवीनुसार मीठ, एक वाटी नारळाचं दूध, पाव वाटी लोणी, भिजवण्यासाठी आवश्यकतानुसार पाणी.

    कृती -

    एका ताटात किंवा परातीत मुरकुचे दळलेली भाजणी मीठ हिंग नारळाचे दूध लोणी एकत्र करून घ्यायचे थोडसं पाणी घालून हे पीठ चांगलं मळून घ्यायचं मळलेल्या मळलेल्या पिठाचा एक गोळा घ्यायचा तो सोऱ्यामध्ये घालून त्याच्या मुरकू अलवार घालायच्या.

    कढईमध्ये शेंगदाण्याचे तेल किंवा खोबरेल तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये मध्यम आचेवर चकल्या तळायच्या या चकल्या लोण्या सोबत ही छान लागतात. यांनाच मुरकु असे म्हणतात.

    पायसम-

    साहित्य-

    पाव वाटी तांदूळ, पाव वाटी साखर , आवश्यकता प्रमाणे पाणी, दोन वाटी दूध, चवीप्रमाणे वेलची पूड , चिमूटभर केशर, काजू बादाम चे काप चारोळी आणि पिस्ता चे काप.

    सर्वात आधी तांदुळाचा भात करावा. स्टीलच्या पातेल्यामध्ये शिजलेला भाताला चांगलं घोटून घ्यावं अगदी एक जीव करून घ्यावा त्याच्यात दूध वेलची पूड केशर काजू बादाम पिस्त्याचे काप घालावे आणि सतत खीर घट्ट होईपर्यंत ढवळावे व आणि शिजवावे. खीर घट्ट तयार झाली की सर्विंग बाऊलमध्ये काढून त्यात आवडत असल्यास थोडेसे नारळाचे दूध घालून एकजीव करावे. त्यावर थोडेसे काजू पिस्ता बादामचे काप आणि चारोळी घालून फ्रिजमध्ये तासभरासाठी ठेवावे. खीर थंड गार झाली की खाण्यास द्यावी.



    vasudha gadgil


Your Rating
blank-star-rating
ऋचा दीपक कर्पे - (13 October 2022) 5
खूप छान!!

0 0