• 04 October 2023

    आपली लघुकथा

    ओलावा

    5 118

    आपली लघुकथा

    ओलावा

    "आठवा ते दिवस, जेव्हां आपल्या कुटुंबियांसोबत तासनतास बोलत असायचा, भावनांचा प्रवाह खळखळ वाहात असायचा! आई, बाबा, काका, काकू यांच्यासोबत कितीतरी गोष्टी, आठवणी आणि विचार एकमेकांना सांगायचा!" पत्नीने आपल्या दुखात बुडालेल्या पतीला सांत्वन करत म्हटले.

    "हो गं..."

    "मोठ्या शहरात येण्याचा निर्णय तुमचाच होता! आधी कुटुंब, मग व्यवसाय आणि मग गावही सोडून दिलं! "

    "बस, याच तर गोष्टीचा पश्चाताप होतोय!" पतीचा अपराधी स्वर कातर झाला होता.

    "हे बघा, पश्चाताप नका करु, मी तर म्हणते आपल्या मुळांकडे जा! एकदा पुन्हा ती वेळ अनुभवून बघा जेव्हां सर्वांसोबत गप्पा, चेष्टा मस्करी आणि आपलेपणाने वागत होता!" पत्नीने समाधान सुचवले.

    आणि त्याच वेळी बागेत काम करत असलेल्या माळ्याचा आवाज आला.

    "धरले, धरले, मुळाला धरले!" माळ्याच्या त्या आवाजाने पतीला आपल्या मुळांकडे जाता जीवनाचा ओलावा परत मिळवण्याचा मार्ग सापडला होता.

    - डॉ. वसुधा गाडगीळ

    हिंदी लघुकथेबद्दल

    "आर्द्र" या नावाने हिंदी भाषेत लिहिलेली ही लघुकथा सांगते, कि संभ्रमात असलेला जीव परिस्थिती आपल्या हाताबाहेर गेल्यावर सर्व काही परमेश्वराच्या हाती सोपवून निश्चिंत होतो. तसेच कधीतरी आपल्या काही न उमजलेल्या भावना, समस्या यांचे समाधान अर्थातच एकदा मुळाकड़े जाणे यात असते. आपली भाषा, आपली मुळं आणि आपण, कसे जपावे या सर्वांना याचे उत्तम प्रवाहमय वर्णन सांगते, डॉ. वसुधा गाड़गीळ यांची लघुकथा ’ओलावा’

    - अंतरा करवड़े



    अंतरा करवड़े


Your Rating
blank-star-rating
Seema Puranik - (06 October 2023) 5
सुंदर कथा

0 0

ऋचा दीपक कर्पे - (04 October 2023) 5
फारच सुंदर आणि सार्वभौम सत्य.....

0 0