• 07 February 2024

    भावविश्व

    ब्रेड....

    5 264

    “आज चहा बरोबर ब्रेड आहे का?” ह्यांनी विचारलं.

    नाही! आता नाश्त्याला पोहे केले आहे. आज सकाळी-सकाळी ब्रेड का बरं!” फळ नाश्ता, दुपारचं जेवण नंतर सरळ रात्रीचं जेवण असा नियम काटेकोरपणे पाळणाऱ्या नवऱ्याला मालतीने सहज विचारलं!

    “अग! काही जुन्या आठवणी! आमच्या लहानपणी रोज सकाळी सकाळी एक ब्रेडवाला यायचा, त्याच्या सायकल वर एक मोठ्ठी लोखंडी पेटी असायची..... सगळ्यांच्या देखत तो पेटीतून एक  मोठ्ठा ब्रेड काढायचा आणि त्याच्या सुरीने चौकोन काप कापायचा, खूप मस्त वाटायचं आणि नंतर आई आम्हाला चहबरोबर ते अगदी फ्रेश ब्रेड खायला द्यायची.  मला खूप गंमत वाटायची. आज अचानक जुन्या आठवणींना उजाळा  म्हणून विचारलं चहासोबत ब्रेड आहे का?”

      “आमच्या लहानपणी आजोळी सकाळी सकाळी ब्रेडवाला यायचा. तुम्ही सांगता तसेच तोही ब्रेडचे काप करून द्यायचा, त्याशिवाय सकाळी-सकाळी गजरे वाला! गजरे...असा जोरात ओरडायचा. त्यानंतर दही विकणारी बाई यायची... आमची आजी आम्हाला दह्यात साखर घालून त्याच्यासोबत पोळी खायला द्यायची खरंच किती सुंदर जुन्या आठवणी होत्या त्या. कालच पावभाजी केली होती पाव आहे ते चालतील का?

    “हो...मग परतून दे!”

    हो! आणते!”

    मी म्हणाले पण मन मात्र जुन्या आठवणीत अडकून राहिले. उन्हाळ्यात आम्ही  आमच्या आजीकडे राहायला जायचो तर हमखास आजीला गजरा घ्यायला लावायचो. संध्याकाळी गजरा लावून इकडे तिकडे भटकत असायचो. रेल्वेच्या डब्यासारख्या सलंग चार खोल्या होत्या आणि त्याच्यातच सगळ्यात शेवटच्या खोलीत स्वयंपाकघर होते. आजीच्या हाताचे नवनवीन पदार्थ आम्हाला खायला मिळायचे आणि संध्याकाळी आजोबांबरोबर महादेवाच्या मंदिरात नाहीतर  मठात आम्ही दर्शनाला जायचो. त्या छोट्याशा घरात आमच्या आत्या आणि काकांसकट सगळे दहा भावंड आणि त्यांचा परिवार दर दिवाळी आणि राखीच्या वेळेस एकत्र व्हायचे. कधीही घर छोटे पडलं नाही किंवा कधी स्वयंपाक कोण करेल हा प्रश्न पडला नाही. त्यानंतर आता सगळ्या  परिवारांची मोठ्ठी घर झालीय पण आता कोणी दसऱ्याला भेटत नाही किंवा दिवाळीला एकत्र होत नाही. आजी आजोबांनी घट्ट जोडून ठेवलं होतं सगळ्यांना! आता घरं मोठी  आहे पण कोणी आधी सारखे एकत्र होत नाही!  आता कोणी दही साखर पोळी खायला देत नाही किंवा संध्याकाळी चला मुलांनो मंदिरात जाऊ असं करून सगळ्या मुलांना एकत्र करून मंदिरात कोणी घेऊन जात नाही. पाहता-पाहता खूप समृद्धी आलीये सगळ्यांकडे भरपूर पैसा आहे.  पण....

    घ्या! मस्त लोण्यात परतलेले पाव आणि चहा.”

    हे ही कदाचित परत जुन्या आठवणीत रमले.....असो!

    सौ. मीनल आनंद विद्वांस 

    -->

    मीनल विद्वांस

Your Rating
blank-star-rating
हेमंत कदम - (08 February 2024) 5

1 1

Smita Saraf - (08 February 2024) 5

1 1

ऋचा दीपक कर्पे - (07 February 2024) 5
खरंतर हे सर्व अनुभवणारी आपली शेवटची पिढी आहे, भाग्यवंत पिढीतील आहोत आपण! जुन्या आठवणींची एक शिदोरी जपून ठेवली आहे. सुंदर लिहिले आहे!

1 1