• 19 February 2024

    भावविश्व

    प्रेम दिवस

    5 241


    आज प्रेम दिवस आहे इंग्रजीत म्हणा तर व्हॅलेंटाईन डे या दिवसाचं कौतुक हल्ली थोडं कमी झालं आहे पण आमच्या कॉलेजमध्ये सकाळपासून हवामान काही वेगळेच आहे. माझ्या वर्गात फार सुंदर-सुंदर मुली आहेत आणि आज सकाळपासून त्या सगळ्याच वाट पाहत आहे कोणीतरी त्यांना लाल किंवा पिवळं गुलाबाचं फुल नक्की देणार. मी दरवर्षीप्रमाणे सगळ्यांकडे पाहत होते त्या सगळ्याजणी माझ्याकडे पाहतात पण त्यांच्या दृष्टीत मलाही कळत असतं या कुरूप मुलीला कोण व्हॅलेंटाईन डे विश करणार किंवा तिच्यावर कोण प्रेम करणार? मी ते सगळं सोडून चुपचाप लायब्ररी मध्ये जाऊन बसले! लायब्ररी माझी आवडती जागा! तिथे शांतता असते आणि तिथे एका नव्या जगाची ओळख होत असते.
    आज पुन्हा मी माझा रस्ता लायब्ररी कडे वळवला! शांतपणे वाचत बसण्याचा आनंद सगळ्यांनाच काही मिळत नसतो, त्यासाठी लागणारी वाचनाची ओढ सगळ्यांकडे नसते! सगळं जग विसरून मी पुन्हा प्रेम दिवसाच्या दिवशी माझ्या पुस्तक प्रेमात हरवले. पाहता - पाहता तीन तास होऊन गेले! आज कदाचितच प्रोफेसर शिकवायला येणारे! मी पण माझ्या प्रेमाला सांगितले आता उद्या पुन्हा भेटू. बाहेर निघताच लोभ आवरला नाही! मी पुन्हा माझ्या वर्गात गेले! मला पाहायचं होतं कोणाकोणाला किती-किती गुलाबाची फुलं मिळाली आहे?
    सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता! म्हणजे सगळ्यांनाच काहीतरी मिळाले! मी त्यांच्या आनंदात सामील झाले, त्यांच्या नकळत मी पण आनंदी होते! पण खरोखरच प्रेम दिवसाच्या दिवशी गुलाबाचे फुल देणारे खरंच प्रेम करतात का?
    प्रेम ते नाही का? जे काळजी घेतं, बरोबर असलं किंवा नाही ज्याच्या मनाला आधार वाटतो भुरळ नाही. फक्त एका वयावर नाही आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर तुमच्या वर प्रेम करतो....असो!....
    कॉलेज मध्ये आता उगीच वेळ वाया न घालवता मी घरी परत निघायला हवं. जे माझ्या परिभाषेत बसत नाही ते माझ्या साठी प्रेम नाहीच नाही....
    तसं ही मी कुरुप असले तरीही माझ्यावर प्रेम करणारी व्यक्ती कुठे ना कुठे नक्कीच असणार....
    “अस्मिता! अस्मिता!” अरे! राहुल! आमच्या कॉलेज मधला अभ्यासात खूप हुशार असणारा राहुल माझ्या मागे उभा होता.
    “मला फिजिक्स चे तु बनवलेले नोट्स हावे होते मी तुला केव्हा पासून शोधतो होतो!”
    “मी लायब्ररीत होते हे घे!” आम्ही दोघेही गप्पा करत कॉलेज मधून निघालो... त्याला अस्मिता नेहमीच नोट्स द्यायची.. पण आता इतर सगळ्या मुली अस्मिता कडे काही वेगळाच दृष्टीने पाहत होत्या हे अस्मिता ला कळलंच नाही...असो!



    मीनल विद्वांस


Your Rating
blank-star-rating
Smita Saraf - (19 February 2024) 5
अप्रतिम 👌

1 2