• 28 February 2024

    भावविश्व

    भेट

    5 157

    “अगं गळ्यातील माळं किती सुंदर आहे! कुठून घेतलीं?”

    भेट मिळाली आहे! माझ्या  खूप आवडत्या  मावशीने मला आणून दिली. ती आदिवासी भागात राहते. तिथल्या आदिवासी बायका या माळा बनवतात आणि घालतात. मला लहानपणी या खूप आवडायच्या म्हणून मागच्या महिन्यात माझ्या मुलाच्या लग्नाच्या आहेरात मावशीने हमखास माझ्यासाठी ही माळ आणली.....!” मला आवडणारी माळ माझ्या ओळखीच्या व्यक्तीला ही आवडली म्हणून मी आनंदाने सगळा इतिहास न थांबता सांगितलं.

    आवड वेगळी पण भेटवस्तू म्हणून कोणी आदिवासी बायकांनी बनवलेली माळं देत का!”

      मी चकित होऊन तिच्याकडे पाहिलं, “अगं आत्ताच तुला आवडली ना!... भेटवस्तू मागच्या भावना माझ्यासाठी जास्त मोलाच्या आहेत...”

       नंतर इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर त्या बाई दुसरीकडे गेल्या. मी मात्र भेटवस्तूं मध्ये अडकले. भेटवस्तू मागचा हेतू महत्वाचा की किंमत? भेटवस्तू मागची आपुलकी महत्वाची की ती कुठून घेतली किंवा कुठून आली आहे हे महत्त्वाचं? समोरचा सध्या कोणत्या परिस्थितीत आहे हे न कळता फक्त किमती वरून त्यांच्या प्रेमाचे मुल्यांकन करावे की फार कमी किमती ची आहे असं ठरवून ती वस्तू छोटी ठरवावी! शेवटी समोरच्या ला तुम्हाला काही द्यावस वाटतं आहे हे महत्त्वाचं नाही का?....

    मी माझ्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी धडपडत होते तेवढ्यात आजच्या लग्नात बोलवणारी मैत्रिण काही भेटवस्तू घेऊन माझ्याकडे आली, “मोहिनी तुला आवडतात तश्या खास शाल मागवल्या आहेत मी सगळ्यांना आहेर म्हणून... तुला आवडतात म्हणून हे पहिलं आहेर तुला.”

     मी आनंदाने ती भेट स्वीकार केली कारण भेटवस्तू च्या मागच्या भावना माझ्यासाठी जास्त मोलाच्या....

    सौ. मीनल आनंद विद्वांस 

    -->

    मीनल विद्वांस

Your Rating
blank-star-rating
Kunda Patkar - (01 March 2024) 5
खरं आहे,पण हल्ली सर्व पैशात मोजलं जातं

1 2

Seema Puranik - (01 March 2024) 5
अगदी बरोबर,आजकाल भावनेपेक्षा किंमत जास्त महत्वाची झाली आहे. सुंदर मांडणी

1 1

Smita Saraf - (28 February 2024) 5

1 1