• 07 April 2024

    भावविश्व

    नातीगोती -४

    0 101

    नातीगोती या सदरसाठी लिहायला सुरुवात केली आणि काही ना काही कारणाने वेगवेगळ्या नात्यांमध्ये अडकलेली मी आज कोणतं नातं लिहायला घ्यावं हा विचार करत बसले!

    देवाच्या कृपेने आणि आईवडिलांच्या आशीर्वादाने नात्यांचे खूप सुंदर बहरलेले वृक्ष आम्हा भाऊ-बहिणीनां मिळाले. येवढंच नाही तर या वृक्षाला कसं खतपाणी टाकावे हे ही त्यांनी उत्तम रीतीनें शिकवले. प्रवास अजून अर्धाच झालाय! जे आम्ही शिकलो ते आता पुढच्या पिढीला शिकवायचं आहे. आयुष्य भरपूर जगायला सगळीच नाती असावी काका-काकू असावे तर मामा-मामी पण हवेत, मावशी-काका आहे तर आत्या-आतोबा पण असावेत. कल्ला करायला चुलत भाऊ बहिणींचा मोठ्ठा घोळका असावा. ह्या प्रत्येक नात्याचं आनंद लुटता आलं पाहिजे....

    हे बाळकडू या नवीन पिढीला शिकवायचं पण ते त्यांना कितपत पचनी पडेल हे काही सांगता येत नाही! नात्यांनी समृद्ध आयुष्याचा आम्ही भरपूर आनंद घेतला आहे पण एक अजून सुचवावेसे वाटतं... तुम्हाला जसा अनुभव येतो नाती ही अशीच असतात! कधी खूप गोड तर कधी खूप कडू! ते तुम्हाला हावे तसें वागतील असे नाही तर ती नाती जशी असतात तसेच ते वागतात ...... शेवटी तुमच्या आयुष्यात कुणी असावं हे तुम्हीच ठरवायचे पण खरं सांगू नात्यांनी समृद्ध आयुष्याची मजा वेगळीच असते.... असो!

        सौ. मीनल आनंद विद्वांस

    -->

    मीनल विद्वांस

Your Rating
blank-star-rating
Sorry ! No Reviews found!