• 20 April 2024

    भावविश्व

    ताई... नातीगोती -५

    5 157

    कविता लिहायला सुरुवात होते ते वय साधारण अजाणतंच असावं. मी वयाच्या बारा किंवा तेराव्या वर्षी माझी पहिली कविता लिहिली असावी....

     सोनटक्के नहीं सो सके.... माझ्या आतोबांनी ही एक विनोदी कविता आम्हाला सांगितली होती.

    नंतर हीच एक आगळीवेगळी  हिंदी कविता मी परत लिहिली

    जीवन की आपाधापी में

    कभी अंधेरो में तो कभी उजालो में

    सोनटक्के नहीं सो सके....

    नंतर माझी अजून ही खूप आवडती कविता लिहिली.....

    सुख दुःख जीवन के दो हाथ

    ना कोई अभिशाप

    दुःख नहीं होता तो दुनिया कैसे सुखी होती

    सुख नहीं होता तो दुनिया कैसे दुःखी होती

    मेरा जीवन है सुख दुःख का मेला

     हंसते खेलते देखेंगे हम यह मेला

    कविता लिहायला इथूनच हळूहळू सुरूवात झाली.

    माझी मोट्ठी चुलत ताई आणि आम्ही सगळे चुलत बहीण भाऊ एकत्र प्रवासाला निघालो होतो. ताईचं एक गोंडस बाळ आणि आम्ही सगळे...आमचा सगळ्यांचा तो पहिला भाचा!  आम्ही सगळे खूप आनंदाने त्याचा सांभाळ करत होतो. तेवढ्यात ताईला कळलं की मी कविता करते तर तिने लगेच मला मी लिहिलेली कविता म्हणायला  लावली .

    नंतर तिने तिच्या बाळावर पण कविता लिहायला सांगितली मी सहज कवी होते की नाही लक्षात नाही पण तरीही मी एक छोटीशी कविता केली ती कविता आज मला लक्षात नाही पण तिच्या या वागण्याने मला अगदी भरभरून उत्साह संचारला आणि मी नंतर वडिलांकडून एक डायरी घेऊन त्या डायरीत तोडक्या मोडक्या भरपूर कविता केल्या... काळांतराने ती डायरी पण हरवली.

    नंतर  खूप वर्षांनी मी पुन्हा थोडंफार लिहायला सुरुवात केली. काही दिवसांपूर्वी माझी  ताई मला परत भेटली ती तशीच आहे अजूनही माझा उत्साहवर्धन करणारी आणि खूप प्रेमळ.

    तिने यावेळी सुद्धा मला कविता करायला सांगितली पण यावेळी तिच्या खूप गोड नातवा साठी. मी पुन्हा एक कविता करते....!

    ज्या नात्यांमधील गोडवा कितीही काळांतराने,  रुसवे फुगवे झाल्यानंतरही कायमस्वरूपी राहतो! ती नाती काही वेगळीच असतात ना..!  थोडक्यात फार गोड असतात.

    आपल्या बरोबर कोणी प्रेमाने आदराने बोलावं आणि आपणही त्याचप्रमाणे, त्याचप्रकारे त्यांच्या बरोबर संभाषण करू शकतो ती नाती खरंतर नेहमीच खूप आनंददायक अनुभव असतात... असो!

     खरंतर 'प्रेम' प्रत्येक नात्यामधील पहिली शर्यत आहे  नंतर सगळं काही .... आपल्या बद्दल आपुलकी वाटणारी माणसं,  आपली काळजी करणारी माणसं  सदैव आपल्यासगळ्याच्या अवतीभवती असावीत हीच श्रींच्या चरणी माझी प्रार्थना....!

      सौ. मीनल आनंद विद्वांस

    -->

    मीनल विद्वांस

Your Rating
blank-star-rating
Akshay Vidwans . - (20 April 2024) 5

1 1