• 11 March 2024

    भावविश्व

    नातीगोती -२

    5 129

    माहेरी जायला कोणाला आवडत नाही! दरवेळेस आम्ही आमच्या चारचाकी ने जायचो पण यावेळी पहिल्यांदाच ह्यांना माझ्याबरोबर येणं जमले नाही. मी यावेळी बसने प्रवास करायचं असं ठरवलं. हे ऑफिस मध्ये जाताना मला बसस्टँडला सोडून गेले. बसमध्ये मस्त खिडकी जवळच्या जागेवर जाऊन बसले... तेवढ्यात कोणीतरी माझे डोळे हाताने बंद केले! खरंतर मी खूप घाबरले असं कोण ओळखीचं आहे! नंतर स्पर्शाने जाणवलं ही तर स्वरा आहे माझी चुलत बहीण.

    स्वरा! अगं किती वर्षांनी आपणं भेटतोय!  कुठे आहे सध्या? काय करतेय?”

    खरंच मोहिनी ताई खूप वर्षें झालीय! मी लांबून तुला अगदी बरोबर ओळखलं. ताई मी मजेत आहे. मला शिरिष च्या जागेवर अनुकंपा भरती मिळाली आहे. आज मावशी ने मलाही घरी बोलावलं आहे. मी तिला मागच्या वेळेस सांगितलं होतं की ताई आली तर मलाही सांग म्हणजे मी ही येईन आणि मुख्य म्हणजे तुझ्या बरोबर गप्पा मारायच्या होत्या. मावशी म्हणाली तू यावेळी बस ने येणार आहे म्हणून चान्स घेतला या बस मध्ये तु भेटते का?”

    मग नंतर ओघाने काय गप्पा रंगल्या आमच्या जसे मधले चार-पांच वर्षं इंग्रजीत म्हणा तर डिलीट झाले......

     “मग आज थांबणार आहे ना? माझ्या बरोबर आई कडे!” मी स्वरा ला विचारलं.

    नाही ताई! उद्या सकाळी पुन्हा ड्युटी वर जायचं आहे. आज जे मिळालं तुझ्याबरोबर गप्पा करून ते काय कमी आहे.... चल आपलं बस स्टॉप आला आहे. मावशीच्या हाताचा गरमागरम स्वयंपाक आपलीच वाट पाहत आहे... पुन्हा लवकरच भेटू ताई.”

    आमच्या कडे राहायला आल्यावर रात्री माझा हात धरून झोपणारी स्वरा!.... नवरा गेल्यानंतर आयुष्याच्या वादळाला येवढ्या आत्मविश्वासाने लढा देत आहेत हे पाहून माझेच डोळे पाणावले... लांब असलो आणि वर्षानुवर्षे भेटलो नाही तरीही नात्यांमधील प्रेम काही कमी होत नाही....असो!

    सौ. मीनल आनंद विद्वांस

    -->

    मीनल विद्वांस

Your Rating
blank-star-rating
MR.POLLEX . - (13 March 2024) 5

1 3

ऋचा दीपक कर्पे - (11 March 2024) 5
एवढ्या कमी शब्दांत एवढे सुंदर कसं लिहिता!

1 1