• 09 June 2020

    हे आभासी जग नाही

    माहिती-तंत्रज्ञान

    5 91

    माहिती-तंत्रज्ञानाच्या स्फोटामुळे कितीतरी सामान्यजन फोटोग्राफर वार्ताहार लेखक कवी समिक्षक शिक्षक संसोधक व्यावसाईक उद्योजक खेळाङु आभ्यासक इव्हेंट मॕनेजर गेम प्रॉग्रामर वेगवेगळे सॉफ्टवेअर हार्ङवेअर व्यवसाय आय टी क्षेत्रातील शिक्षण कलाकार फिल्म मेकर ङिझायनर संयपाकी पर्यटन खगोल अवकाश शात्र, व्यवस्थापक बनले. अगदी जे आपण मनात आणाल ते करणे शक्य आहे. मल्टीटास्किंग हे एक प्रमुख अस्त्र या युगाची देणगी आहे. मल्टीटास्किंगचे फायदे तोटे आहेत परंतू सक्षम व्यक्ती फायदाच करुन घेतात.

    तुलनेने माहिती-तंत्रज्ञानाचे तोटे फारच कमी आहेत. स्वहस्ते लिखाण, पुस्तक वाचन, चिंतन, आभ्यास, मेहनत, खुपच कमी होतय कारण सर्वकाही तयार रेङिमेङ मिळतय. बऱ्याच लोकांच यामुळे स्वतःकडे व कुटुंबाकङे दुर्लक्ष होते, मग कलह तणाव अव्यवस्था अगदी मानसिक रुग्णसुद्धा वाढीस लागले आहेत. " Once on web, always on the web " या उक्तिनुसार जोपर्यत कोणताही डाटा, फोटो आपल्या गॕजेटच्या गॕलरीत असतात तोपर्यंत ते सुरक्षित असतात. परंतू जेव्हा ते आपण सोशल मिडियावर शेअर करतो तेव्हा मात्र ते सार्वजनिक होतात आणि मग त्याचा प्रसार अथवा हाताळणी आपल्या आवाक्याबाहेर जाते.


    आधुनिक संगणकीय शीघ्र डिजीटल प्रणालीद्वारे आणि मोठ्याप्रमाणातील ङेटा बनवने, जतन करणे, हस्तांतरण करणे आणि त्याच्या उपभोगयोग्यतेमुळे जागतीक समुहाचे मोठे रुपांतर झाले. समाजाच्या दैनदिन जीवनात उत्क्रांती घङुन समानमन परिवर्तन होतानाच समग्र व्यवहाराचा कायापालट झाला. व्यक्तीच्या भावविश्वामधे अमुलाग्र बदल घङविण्याची दुर्दम्य क्षमता आणि मनोव्यापाराचा ठाव या विश्वाला ज्ञात झाला आणि मग त्याचाकङे वित्तक्षेत्र आकृष्ट झाले.

    वित्तक्षेत्र आज जगाच्या उठाठेवीचे सारथ्य करित असून त्याने इंटरनेट व्यवसायातील संधी हेरली. नफ्यातील व्यापाराच्या प्रत्येक संधीचा फायदा घेत प्रथम दळणवळण, उद्योग, औद्योगीकरण, प्रशासकीय, बँकिंग क्षेत्रात आपला ठसा उमटवताना इंटरनेट धुरीनांना मानवाच्या मनोविश्वातील संधी खुणावु लागल्या. प्रारंभी मानवाचे वेगाबद्दलचे आणि अदभुत प्रचंङतेबद्दलचे वेङ आकर्षण व्यवसायाच्या केद्रस्थानी ठेऊन त्याबरहुकुम सहज हाताळण्याजोगी प्रणाली विकसित केली गेली. पुढे मनोरंजन, खेळ, साहित्य, पाककौशल्य, विज्ञान, इतिहास भुगोलादी अध्ययन, शैक्षणिक, वैद्यकिय, अध्यात्म ईत्यादी बरोबरच अॉनलाईन खरेदीचा प्रचंङ आवाका आणि निमिषमात्रे उपभोग घेण्याच्या सुलभतेमुळे इंटरनेट जीवनाचे अविभाज्य अंग बनले.

    मानसशास्त्रिय तज्ञांच्या अनुभवानुसार काही प्रमाणात या तंत्राच्या वेङापाई बरीचशी तरुणाई, प्रौढ व्यक्तींसोबत काही आपदा आली आहे हे मान्य. माहिती तंत्रज्ञानाच्या मोहजालात पालकत्वाच्या सीमा आणि मुलांच्या स्वातंत्र्याच्या परिभाषा नव्याने लिहिण्याची, ठरवण्याची गरज सध्याचा चिंतेचा आणि कदाचित म्हणून अधिक चिंतनाचा विषय आहे. सोशल मीडिया, इंटरनेट यांच्या वेगवान प्रणालींमुळे आज कुठल्या वाईट गोष्टीचा प्रादुर्भाव फार जलद पसरतो. परंतू कुठल्याही संसाधनाचा अथवा उपलब्धीचा वापर करण्याचे तारतम्य असायला हवचं.
    माहिती-तंत्रज्ञानाचा समग्र आढावा घेताना त्यातील गुणवत्ता आणि दुर्गुणाची चर्चा होणे क्रमप्राप्त आहे. प्रथम माहिती म्हणजे काय ते पाहुया. अर्थपुर्ण रीतीने प्रक्रिया करुन संघटित केलेली आणि नव्याने संदर्भविकसित

    करता येऊ शकणारी गोष्ट म्हणजे माहिती. तर तंत्रज्ञानामुळे भौतिक साधनांच्या सहाय्याने माहिती संस्कारीत

    फेरफार किंवा बनावट करुन सत्य-असत्य स्वरुपात प्रवाही करता येते.
    माहिती तंत्रज्ञान अस्तिवात असलेल्या तंत्राचा अधिक अचुक आणि विस्तृत उपभोग शक्य होतानाच नवनवीन क्षेत्रातील संधीच्या उदयाचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष साधन आहे.
    लष्कर मनोरंजन वित्त अकाऊटींग-बँकिंग अभियांत्रिकी शैक्षणिक वैद्यकीय जणुकीय व्यापार औद्योगिक कृषी दळणवळण बांधकाम संशोधन राजकिय सामाजिक पर्यटन पत्रकारिता अंतर्गत-सुरक्षा अजस्र प्रकल्प अवकाश पुरातन वारशाचे जतन आदी क्षेत्रामधे संदेशवहन आणि प्रत्यक्ष निर्मितीमधे आजचे माहिती-तंत्रज्ञान जबाबदारीने कार्यरत आहे. वरील सर्व बाबीं आपल्या जीवनाशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे निगडित आहेत आणि त्यातील बऱ्या वाईट परिणामांचे आपण लाभार्थी आहोत.

    कोणाच्याही खाजगी आयुष्यात डोकावणे सहजपणे शक्य असणे आणि वैयक्तिक संवादात्मक सहवासामधे गुप्तता ठेवणे शक्य असल्यामुळे कोणत्याही वयातील मुलांना प्रौंढांना भावनिक दृष्ट्या गुंतवून अतिरिक्त प्रेमाचे ईमले रचले जातात तर दहशतवादी संघटना सावज हेरुन धार्मिक उन्माद वाढवत मोठी व्याप्ती आणि अनेक व्यासपीठे असलेले सोशल मिङियाचे तंत्र वापरुन अनेक विचार, प्रचार, अपप्रचाराच्या मदतीने तरुण पीढीला कट्टरतेकङे नेऊन हाती शस्त्र देऊन अनैसर्गिक लढाईस प्रवृत्त करण्याचे मोठे आव्हान या दहशतवादी गटांनी जगापुढे निर्माण केले आहे. आपल्या मुलांना आपण काय खावे काय प्यावे काय ल्यावे अगदी रस्ता ओलांङायची सुद्धा मदत करतो परंतू त्याच्या हातात मोबाईल यंत्र देताना इंटरनेटच्या या अवाढव्य जगात मात्र एकट्याला सोङताना पालक ते गांभिर्याने घेत नाहीत. माहितीच्या या अतिप्रचंङ स्फोटामुळे जस मृगजळाच्या लालसेने तृष्णा भागविण्यासाठी जीवाच्या आकांताने धावणाऱ्या कस्तुरीमृगाच्या मार्गाने तर आपण या शीघ्रप्रवाही मायाजालात फसत तर जात नाही ना ? हे पहाणे अगत्याचे आहे !
    मी हा लेख लिहित आहे तो केवळ या इंटरनेटच्या सहाय्यामुळेच आणि तो संबंधितांना वायुवेगाने सामाईक करु शकलो ते व्हॉट्स अप फेसबुक सारख्या सर्वमान्य आणि तुलनेने सुरक्षित अशा सोशल मिडियामुळेच.
    कोणतीही नवीन उपलब्धी आपले गुण-अवगुण, फायदे-तोटे घेऊनच जन्म घेते. विवेकाने आणि धैर्यशिलतेने जाणीवपूर्वक त्याचा अंगिकार करणे हे विचारी बुद्धिमत्तेचे निसर्गदत्त दान प्राप्त असलेल्या मानवास सहज शक्य आहे.पलिकडची व्यक्ती अथवा परिस्थिती प्रत्यक्ष तुमच्या समोर नाही म्हणून हे विश्व आभासी म्हणवलं जाऊ शकत नाही; आणि याचा उत्तम फायदा करून घ्यायचा ठरवला तर एक सक्षम व्यक्ती याचा उत्तम उपयोग करून घेऊ शकते. माहिती-तंत्रज्ञानाचे हे विश्वव्यापी स्वरुप पहाता, हे आभासी जग आहे असे कसे बरे म्हणता येईल ? सजीवाचा प्रत्येक भौतिक व्यवहार हा त्याच्या मानसिकतेचेच प्रतीक असते. जर आपण आपले सर्वच भौतिक व्यवहार इंटरनेटच्या सहाय्याने ङोळसपणे कुठेही मती गुंग होऊ न देता, वेळेचे भान राखत जाणीवपूर्वक आणि स्वताःच्या आणि ईतरांच्या नागरी हक्काची पायमल्ली होऊ न देता परंतू त्यामधुन उपलब्ध असलेल्या अगणित संधीचा पुर्ण कार्यक्षमतेने सृजनशील कामासाठी उपयोग करित असू तर मग या तंत्राला आभासी म्हणून का हिणवले जाते ?


    घनश्याम



    Ghanshyam Parkale


Your Rating
blank-star-rating