• 16 June 2020

    हे आभासी जग नाही

    माहिती-युग आणि आंतरजाल (इंटरनेट)-

    5 137

    माहिती-युग आणि आंतरजाल (इंटरनेट)-
    प्रिमॅकॅनिकल, मॅकॅनिकल, ईलेक्ट्रो- मॅकॅनिकल आणि ईलेक्ट्रॉनिक साधनांचा विस्तृत वापर सुरवातीला लष्करात आणि नंतर विविध कारखानदारी उद्योगात होत गेला. ईलेक्ट्रॉनिक युगाच्या आगमनाचा महत्वाचा पुढील टप्पा आहे माहिती युगाचा. मॅकॅनिकल युगात उद्योगातुन औद्योगिक क्रांती घङली तद्वत पारंपारिक कारखाने उद्योगातुन वित्तक्षेत्राकङील वळण हे ङिजिटल माहिती युगाची क्रांतीकारी घटना आहे.

    ईमेल हा माहितीचे संदेश व फाईलचे अदान-प्रदान करणारा पहिला प्रयोग होता. संगणकाची आज्ञावली म्हणजे सॉफ्टवेअरच्या उपयोगीतेने हे शक्य झाले आहे. आंतरजाल म्हणजे इंटरनेट ही जणू प्रगत माहिती-तंत्रज्ञानाची समानार्थी अभिव्यक्ती आहे आणि पुर्णांशाने निर्दोष विनियोग आहे. अनेकानेक संगणक एकाचवेळी एकत्र जोङले जाऊन कोणतीही चुक न करता ही संकल्पना कार्य करते. विकेंद्रीकरणाच्या उपलब्धतेमुळे, अमर्याद साठवणुक व पर्यायी मार्गक्रमणा करण्याची क्षमता यामुळे सर्वच इंटरनेट एकाचवेळी अपयशी करता येत नाही.

    १९६९ पासुन इंटरनेट अस्तित्वात आले. १९८९ साली ब्रिटीश संशोधक टीम बर्नस ली याच्या संशोधनाने वर्ल्ङ वाईङ बेब अस्तित्वात आले आणि १९९१ साली इंटरनेटचे सहजसुलभ साधन सर्वसामान्यांना हाताळणे सहजसाध्य झाले. जागतीक व्यवहारातील इंटरनेटचे व्यासपीठ सर्वंकश माहिती संक्रमणातील प्रचंङ गतीमानतेमुळे बरीच जुनी प्रचलित माध्यमे एकतर कालबाह्य ठरली किंवा निरुपयोगी झाली.

    माहिती-तंत्रज्ञानाचा समग्र आढावा घेताना त्यातील गुणवत्ता आणि दुर्गुणाची चर्चा होणे क्रमप्राप्त आहे. प्रथम माहिती म्हणजे काय ते पाहुया. अर्थपुर्ण रीतीने प्रक्रिया करुन संघटित केलेली आणि नव्याने संदर्भविकसित करता येऊ शकणारी गोष्ट म्हणजे माहिती. तर तंत्रज्ञानामुळे भौतिक साधनांच्या सहाय्याने माहिती संस्कारीत फेरफार किंवा बनावट करुन सत्य - असत्य स्वरुपात प्रवाही करता येते.

    माहिती तंत्रज्ञान अस्तिवात असलेल्या तंत्राचा अधिक अचुक आणि विस्तृत उपभोग शक्य होतानाच नवनवीन क्षेत्रातील संधीच्या उदयाचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष साधन आहे.

    लष्कर मनोरंजन वित्त अकाऊटींग-बँकिंग अभियांत्रिकी शैक्षणिक वैद्यकीय जणुकीय व्यापार औद्योगिक कृषी दळणवळण बांधकाम संशोधन राजकिय सामाजिक पर्यटन पत्रकारिता अंतर्गत-सुरक्षा अजस्र प्रकल्प अवकाश पुरातन वारशाचे जतन आदी क्षेत्रामधे संदेशवहन आणि प्रत्यक्ष निर्मितीमधे आजचे माहिती-तंत्रज्ञान जबाबदारीने कार्यरत आहे.

    वरील सर्व बाबीं आपल्या जीवनाशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे निगङित आहेत आणि त्यातील बऱ्या वाईट परिणामांचे आपण लाभार्थी आहोत.

    सुरक्षेच्या कारणांमुळे रस्तोरस्ती दिसणारी सीसी टीव्हीयंत्रणा सोसायटीतून आपल्या उंबरठ्यापर्यत पोहचली हे माहिती-तंत्रज्ञानाचे टेलिकम्युनिकेशनतंत्राने सर्वदुर पसरलेले तुलनेने संक्षिप्त दृष्यरुप आहे.

    तर आताच प्रकाशित झालेल्या उरी या हिंदी चित्रपटात एक दृष्य पहा. शत्रु सीमेवर उपग्रहातून नजर ठेऊन ऐनवेळी मिळालेल्या संदेशानुसार, शत्रुराष्टाने पेरलेल्या विमानविरोधी अस्त्रांचा सुगावा लागला आणि सुपरसॉनीक वेगाने शत्रुराष्ट्राच्या सीमापार करुन हल्ला करणार तोच शेवटच्या क्षणी म्हणजे अवघे सहा सेकंद उरले असताना सीमोलंघन होऊन कपाळमोक्ष होऊ पहाणाऱ्या आपल्या लढाऊ वैमानिकाला शीघ्रसुचनेद्वारे परावृत्त करताना निमिषार्धात माघारी बोलावून अपयशी होऊ शकणारे गुप्त मिशन एका विलक्षण थरारक विजयामधे परावर्तित करणे केवळ उच्च श्रेणीच्या संरक्षण माहिती-तंत्रज्ञानामुळेच शक्य झाले.
    या ठिकाणी आपण सामान्य नागरी गरजा आणि उच्च दर्जाच्या लष्करी मोहिमेत माहिती-तंत्रज्ञानाचा अविष्कार पाहिला.
    आता काही प्रमुख दुरुपयोग पाहुया. साधारण १८५० च्या दशकात पुढारलेल्या युरोपियन राष्ट्रांनी एज अॉफ इंपिरिएलिझम म्हणजे साम्राज्यवाद या संरचनेद्वारे अविकसित भुभागावर लष्कर व तंत्रज्ञानाच्या ताकदीने व्यापार आर्थिक राजकिय सांस्कृतीक आणि वैचारिक वर्चस्व राखण्याचे धोरण आखले. पारतंत्र्यातील देशामधील कच्चा माल घेऊन विकसित परदेशी राष्ट्रामधे पक्का माल तयार करुन पुन्हा त्याच राष्ट्रात विकणे हे व्यापारी धोरण राबवताना तेथील लोकसंख्या व साधनसंपत्ती काबुत ठेवण्याचे हे तंत्र आहे.
    वाफेच्या इंजिनाच्या शोधामुळे जहाजे आणि रेल्वेमार्ग ही प्रत्यक्ष दळणवळणाची साधने होती.

    आताही तेच घङत होत. फरक इतकाच की प्रत्यक्ष संपर्काच बंधन बाद झाल. जगावर राज्य करणार माहिती-तंत्रज्ञानाच्या नाङ्या बहुतांशी युरोपियन राष्ट्रांच्या ताब्यात आहेत. म्हणून आपल्याकडे विकसित झालेल्या आय टी कंपन्यांमधुन परदेशस्थ कंपन्या आपल्याला काम पाठवतात आणि कमी खर्च व दायित्वान्वये स्वतःचा मोठा फायदा करुन घेतात. मोबाइलवरील प्रत्येक क्लिक परदेशस्थ सरकारांच्या उत्पन्नात भर घालते, असा एक काळ होता. माहिती-तंत्रज्ञानाचा अतिवेगवान प्रचंङ आवाका पहाता या तंत्राच्या स्वामीत्वाने अतिप्रगत युरोपियन आणि चीन ही राष्ट्रे भारतासारख्या विकसनशील देशामधील संस्कृती, लोकसंख्येची क्रयशक्ती, साधनसंप्पत्ती काह्यात ठेवुन हा प्रगत साम्राज्यवाद राबविण्यात यशस्वी होण्याचा प्रयत्न करताहेत.


    परंतू आता परिस्थिती बदलतेय. भारतातील साफ्टवेअर उद्योजक, स्वताःच्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेन्ट कंपनीतून आजवर इतर देशांमध्ये सॉफ्टवेअर उत्पादने निर्यात करत आहे. भारत माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात अग्रेसर झालाय. आज भारताकडे स्वतःचे सॅटेलाईट आहेत जे अमेरिका, रशिया आणि इतरही काही युरोपीयन राष्ट्रांनी लिझवर घेतले आहेत; घेत आहेत. अनेक क्रॉस बॉर्डर ट्रीटी आहेत ज्याद्वारे माहिती आदान - प्रदान परस्पर संमन्वयाचे नियम मान्य करण्यात आले आहेत. भारतीय टॅलेंटवर अवलंबून असलेले व्यवसाय भारतीय टॅलेंटसाठी नंदनवन ठरलेलं आहे. आज अनेक भारतीय कुटूंब यामुळे परदेशस्थ स्थायिक होऊन भारतात इन्व्हेस्टमेन्ट करत आहेत. भारतात परकिय गुंतवणुक वाढत आहे. इंटरनेट सिक्युरिटी परिषदेमध्येही भारताची महत्वाची भूमिका राहिलेली आहे. भारत हा त्या काही मोजक्या देशांपैकी आहे ज्यांच्याकडे आज Information Technology Act आणि Digital Evidence Act आहे. आजच्या घडीला कुठला देश भारतासारख्या देशावर तंत्रज्ञानाच्या सहाय्याने साम्राज्यवाद लादू शकेल अशी परिस्थिती नाही. हे माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात भारताने मोठी झेप घेतली आहे.



    Ghanshyam Parkale


Your Rating
blank-star-rating