• 23 June 2020

    हे आभासी जग नाही

    आभासी युगे

    5 89

    प्रिमॅकॅनिकल -

    पुर्वयांत्रिक युगाच्या सुरवातीला, इ.स. पुर्व ३००० वर्षांपासुन मानव संपर्क साधु लागला. या वेळी मानव चित्राकृती मादक द्रव्य इत्यादींच्या सहाय्याने हक्काचा लष्करी भुप्रदेश, गोष्ट अथवा नकाशांनी हक्क प्रदर्शित करुन माहीतीची देव-घेव करू लागला. काही ठिकाणी कापङावर, भुर्जपत्रावर, कागदावर चित्रांच्या सहाय्याने गोधनाची गणणा आणि श्रीमंतीच शौर्य सामर्थ्याचे प्रदर्शन होऊ लागल. जेवढे गाई गुरे जनावरे असत तेव्हङी त्यांची चित्रे काढुन टोळी-समाजामधे माहिती उध्दृत करण्याची प्रथा रुढ झाली.

    मॅकॅनिकल-
    सांप्रतचे तंत्र आणि पुर्वजांमधील गरजा सांधण्याचे काम यांत्रिक अर्थात मॅकॅनिकल शाखेने केले. मानवाच्या वाढत्या आर्थिक आणि प्रशासकीय गरजांमुळे या काळात हे तंत्रज्ञान खुपच विकसित झालं कारण मोजमाप, गणना, उत्पादन आणि माहितीची साठवणुक याला महत्व आल.
    याच काळात अंकगणित करता येणारे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार करुन देणारे ऍनालॉग पठङीतील परंतू यांत्रिक गणक ज्यांना यांत्रिक संगणक अस म्हणता येईल अस यंत्र ब्लेस पास्कल या शास्त्रज्ञाने संशोधीत केल याच “ पास्कलाईन ” अस नामकरण करुन फ्रांसचे चौदावे राजे लुईस यांचेकङुन सन्मानीत करण्यात आल. त्याचा काळ होता ई.स. १६४९ त्यास “ अंकगणित – यंत्र “ अर्थात “ ऐराथमटिक मशिन “ असही संबोधीत असत.

    ईलेक्ट्रो- मॅकॅनिकल-


    ईलेक्ट्रो- मॅकॅनिकल तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आजच्या दुरस्थ-संपर्क अर्थात टेलिकम्युनिकेशन युगाची सुरवात झाली. यातच बऱ्याच संशोधनामुळे एकप्रकारे क्रांती झाली. विद्युत-चुंबकिय म्हणजे ईलेक्ट्रो- मॅग्नेटिक व रेङिओ-लहरी म्हणजे रेङिओ-व्हेव्हच्या संशोधनाने टेलिग्राम, मॉर्स-कोङ, टेलिफोन आणि रेङिओ इत्यादी प्रत्यक्ष लाभ देणारी उपकरणे विकसित झाली. ईलेक्ट्रो- मॅकॅनिकल स्विच रिलेचा शोध हा महत्वाचा घटक होता. आजच्या प्रगत माहिती-तंत्रज्ञानाच्या विकासाठी हे ईलेक्ट्रो- मॅकॅनिकल क्षेत्रातील संशोधन हा मैलाचा दगङ आहे.
    पहिला मोठ्या प्रमाणातील संगणकाचा उपयोग हा युनायटेड स्टेट्स मधे झाला. १९४४ साली आ.बी.एम. ने बनविलेला “ हेवर्ड मार्क १ “ हा अजस्र संगणक पाच टन वजनाचा आणि २ x ८ x ५० फुट आकाराचा होता. पुर्वक्रमिक प्रणालीच्या अर्थातच प्रोग्राम्ङ पंच कार्ङच्या सहाय्याने याचा उपयोग मॅनहॅटन प्रकल्पात प्रतिकात्मक अनुबाँब स्फोटाच्या व्यवहार्यतेची शक्यता तपासण्यासाठी केला गेला.

    ईलेट्रॉनिक -

    या युगामधे या अगोदरच्या ईलेक्ट्रो- मॅकॅनिकल स्विचची ( रिले )जागा ईलेक्ट्रॉनिक व्हॅक्युम स्विचेसनी घेतली. या संशोधनामुळे प्रचंङ उत्क्रांती झाली कारण पुर्वीच्या रिलेमधे मॅकॅनिकल भागांची हालचाल होत असे त्यामधे झीज होऊन मर्यादा येत असत. ईलेक्ट्रॉनिक व्हॅक्युम स्विचेस पुर्वीच्या रिलेपेक्षा हजारोपटींनी कार्यक्षम आणि वेगवान आहेत कारण पुर्वीच्या रिलेसारखी झीज होत नाही.

    ENIAC ईलेट्रॉनिक न्युमरिकल अँङ कंपुटर हे पहिले ईलेक्ट्रॉनिक साधन होते. याच्या मदतीने पुर्वप्रणालीच्या सहाय्याने मोठ्या श्रेणीचे संख्यात्मक प्रश्न सोङवत अपेक्षित वेगवान परिणाम साधता आले. प्रारंभी याचा उपयोग ङागलेल्या तोफगोळ्याच्या गणणेसाठी अमेरिकन लष्करी बॅलॅष्टीक रिसर्च प्रयोगशाळेत झाला. उष्मांकविरोधी अर्थात थर्मोन्युक्लिअर अस्त्रांच्या व्यवहार्यतेच्या आभ्यासासाठी या प्रणालीचा पहिल्यांदा आंतर्भाव झाला.



    Ghanshyam Parkale


Your Rating
blank-star-rating