मित्र हो ..सदर महादेव मंदिर हे अगदी ६ व्या शतकातील असून सुंदर, देखणे, उत्कृष्ट, पुरातन, आणि पवित्र असे भगवान शिवप्रभुंचे स्थान आहे. सध्या मंदिर थोडे भग्नावस्थेत आहे परंतु येथील शिल्पाकृतींची तुलना आपण थेट खजुराओ किंवा अजंठा वेरूळ येथील मूर्ती कलेशी करू शकतो. आयुष्यात प्रत्यकाने एकदा तरी जावे आणि येथील अद्भुत कथा, पुरावे, संदर्भ सारेच काही जाणून घ्यावे, अभ्यासावे इतक्या विलक्षण गोष्टी आपल्या पाहण्यात येतील हे निश्चित.