आढावा: स्वर: राधिका भांडारकर
या संग्रहात एकूण चाळीस कविता आहेत. त्यांचे वैशिष्ट्य असे की,यातील एकही कविता मुक्तछंदातील नसून ,प्रत्येक कविता नियमबद्ध आहे. त्यामुळे या चाळीस कवितातून चाळीस काव्यप्रकाराची अरुणाताई यांनी ओळख करून दिली आहे. षटकोळी,कृष्णाक्षरी,शोभाक्षरी,शंकरपाळी, नीरजा,मधुसिंधु, रट्टा वगैरे एकाहून एक सुंदर काव्यप्रकार उलगडत जातात. प्रत्येक काव्यप्रकाराचे नियम त्यांनी सांगितले आहेत. ओळी,यमक,वर्ण अक्षरं,शब्द यांची संख्या मांडणी याविषयीचे संपूर्ण तपशील यात दिले आहेत.त्यामुळे या सर्व काव्यरचना वाचताना आपोआपच एक लयबद्धता येते.आणि वाचकाला त्या रमवतात. अनुक्रमणिका ● अर्पण पत्रिका ● प्रस्तावना ● मनोगत ● ऋतुराज 1. नाते प्रेमाचे (षटकोळी रचना) 2. उदासीनता (कृष्णाक्षरी) 3. भावसुमने (शोभाक्षरी) 4. जीवनरंग (शंकरपाळी काव्य) 5. निसर्गदान (प्रणु चाराक्षरी) 6. नाते तुझे माझे (काव्याक्ष रचना) 7. वात्सल्य मूर्ती (द्विशब्दी रचना) 8. कविता (श्रीकाव्य) 9. उन्हाळ्याची सुट्टी (मधुसिंधू काव्यरचना) 10. निर्माता (नीलकाव्य) 11. परमतत्व (काव्यांजली रचना) 12. नको करू पैसा पैसा (अखंड काव्य) 13. फुलराणी (नीरजा काव्य) 14. मारवा (मधु दीप काव्य) 15. कसे जगावे (संगीताक्षरी काव्यरचना) 16. प्रियतमा (अनघ काव्यरचना) 17. रंगमंच (लीनाक्षरी) 18. नाते मैत्रीचे (चंदन नवाक्षरी) 19. रट्टा (रट्टा काव्य) 20. प्रकाश (गुंफण काव्य) 21. माझा फुलोरा (दर्पण काव्य) 22. वर्षा ऋतु (शामलाक्षरी काव्य) 23. सौभाग्यालंकार (काव्यबत्तीशी काव्य) 24. नका करू खोटं काम (म्हणीवरून काव्य) 25. मातृत्व (पंचाक्षरी काव्य) 26. वारकरी (अष्टाक्षरी रचना) 27. संसार (त्रिवेणी काव्य) 28. संत नामदेव (अभंग रचना सुधाकरी) 29. स्वर निनाद (द्रोण काव्य) 30. देव (पिरामिड काव्य) 31. कविता (शेल काव्य चारोळी) 32. समाधान हेचि सुख (ओळकाव्य अष्टाक्षरी) 33. हायकू 34. ऋतु बरवा (दशपदी) 35. शोभा (बाणाक्षरी) 36. अंगणी माझिया (षडाक्षरी) 37. शब्दवैभव (शिरोमणी काव्य) 38. श्रावणरंग (अभंग प्रकार २, छोटा अभंग) 39. पानगळ (जापानी तांका काव्य) 40. चढउतार (जोड शब्द काव्य)