खरंच हा ऑडियो मला माझ्या शाळेच्या "आधी छुट्टी" मधे घेऊन गेला.. आपण अगदी खरं बोललात, लहानपणच चविष्ट असतं! मला अजूनही आठवतं, माझी एक विमलेश नावाची मैत्रीण भेंडीची भाजी आणायची.. ती चव अजून माझ्या जीभेवर आहे. तशी भाजी मी आजवर नाही खाल्ली! तसेच आमच्या शाळेत गरीब घरची मुले येत होती, त्यांचा डबा म्हणजे "अचार रोटी" किंवा "सेव रोटी" भाजी त्यांच्या कडे बनतच नव्हती. तर आमच्या डब्यातून भाजी खाऊन त्यांचे ते समाधानी आणि आनंदी चेहरे आजपण आठवतात! धन्यवाद एवढ्या सुंदर ऑडिओ साठी!
Publish Date : 25 Apr 2022
Time to listen : 00:07:40
Free
Reviews : 5
People Listen : 267
Added to wish list : 0